रेल्वे स्टेशन असो वा एसटी स्टॅंड, सर्वत्र प्रवाशांच्या गर्दीत पाकीटमार व भुरट्या चोरांचाही मोठ्या प्रमाणात वावर असतो.
सोलापूर : रेल्वे स्टेशन असो वा एसटी स्टॅंड, सर्वत्र प्रवाशांच्या गर्दीत पाकीटमार व भुरट्या चोरांचाही मोठ्या प्रमाणात वावर असतो. मिळाली संधी की, संबंधित प्रवाशाला झटका देऊन पैशाचे पाकीट, मोबाईल व इतर मौल्यवान वस्तू नकळत लंपास होण्याचे प्रमाण वाढले आहे. चोरीच्या घटना तर रोजच्याच. चोरी घडली की रेल्वे स्थानकावरील चहा, मिनरल वॉटर व इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे संशयाची सुई वळते. मात्र सोलापूर रेल्वे स्थानकावर (Solapur Railway Station) शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर येथील चहा विक्रेत्याने प्रवाशाकडून विसरण्यात आलेला किमती मोबाईल पोलिसांकडे सुपूर्द करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले अन् 'हम गरीब जरूर है मगर लालची नही, हम मेहनत की खाते है हराम की नही' असा संदेशच दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे स्थानकावर शुक्रवारी (ता. 5) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुंबई- बंगळूर उद्यान एक्सप्रेस थांबली होती. या गाडीतून प्रवास करत असताना सोलापूर स्थानकावर चहा पिण्यासाठी उतरलेल्या प्रवासी त्याचा 40 हजार रुपये किमतीचा मोबाईल स्थानकावरील चहा कॅंटीनवर विसरला होता. मात्र रेल्वे स्थानकावरील चहा विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या प्रामाणिकपणामुळे 40 हजार रुपये किमतीचा मोबाईल लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रामाणिक चहा विक्रेत्याचे नाव आहे एजाज दांडू.
सोलापूर रेल्वे स्थानकावरील चहा विक्रेता एजाज दांडू (रा. सोलापूर) याने प्रामाणिकपणे मोबाईल लोहमार्ग सोलापूर पोलिस ठाण्यात आणून जमा केला. संबंधित प्रवाशाला आपला मोबाईल सोलापूर रेल्वे स्टेशनमध्ये विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पुढील स्थानकात उतरून सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल झाला. आल्यावर लोहमार्ग पोलिसांनी संबंधित प्रवाशाची खात्री करून त्याचा मोबाईल त्याला परत दिला. या मोबाईलमध्ये प्रवाशाचे पुढील प्रवासाची तिकिटे, कंपनीची महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर महत्त्वाची माहिती अपलोड असल्याने हा मोबाईल मिळवणे त्या प्रवाशासाठी अत्यावश्यक होते.
चहावाल्याच्या प्रामाणिकपणामुळे प्रवाशाचा मोबाईल मिळाला आणि प्रवाशाचे मोठे नुकसान होण्यापासून वाचले. यासाठी प्रवाशाचे देऊ केलेले बक्षीस देखील चहा विक्रेता एजाज दांडू यांनी नाकारून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.