तिसऱ्या लाटेत एका दिवसात 35 हजार रुग्ण असतील अ‍ॅक्‍टिव्ह

आरोग्य विभागाचा अंदाज
Corona Update
Corona Updatecorona
Updated on
Summary

सोलापूर शहर-जिल्ह्यात तिसरी लाट आल्यानंतर सर्वाधिक 35 हजार 531 रुग्ण एकाचवेळी उपचार घेत असतील, असे अंदाजातून स्पष्ट केले आहे.

सोलापूर: कोरोनाच्या दोन्ही लाटांच्या तुलनेत तिसऱ्या लाटेतील अ‍ॅक्‍टिव्ह रुग्णांची संख्या सर्वाधिक राहील, असा अंदाज सार्वजनिक आरोग्य विभागाने वर्तविला आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यात तिसरी लाट आल्यानंतर सर्वाधिक 35 हजार 531 रुग्ण एकाचवेळी उपचार घेत असतील, असे अंदाजातून स्पष्ट केले आहे.

Corona Update
परीक्षा न दिलेल्यांना पुन्हा मिळणार संधी! सोलापूर विद्यापीठ

शहरातील हद्दवाढ भागासह दाटीवाटीच्या नगरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा यापूर्वीचा अंदाज आहे. तर ग्रामीणमध्ये बार्शी, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या चार तालुक्‍यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. याचा अंदाज घेऊन जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा दर्जेदार केली जात आहे. दरम्यान, दुसऱ्या लाटेत 11 मे रोजी जिल्ह्यातील अ‍ॅक्‍टिव्ह रुग्णांची संख्या सर्वाधिक 23 हजार 687 झाली होती. मात्र, आता तिसऱ्या लाटेत एकाच दिवशी अ‍ॅक्‍टिव्ह रुग्णसंख्या 35 हजार 531 एवढी असणार आहे.

Corona Update
सोलापूर जिल्ह्यातील 199 शाळा मुख्याध्यापकांविनाच !

त्यातील 23 हजार 95 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असतील तर तब्बल 12 हजार 436 रुग्णांमध्ये मध्यम व तीव्र लक्षणे असतील, असेही सार्वजनिक आरोग्य विभागाने अंदाजातून स्पष्ट केले आहे. या रुग्णांना ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरसह औषधोपचाराची गरज भासणार आहे. त्यात सर्वाधिक बालकांचा समावेश असू शकतो, असाही अंदाज आहे. या पार्श्‍वभूमीवर तिसऱ्या लाटेपूर्वी ठोस उपाययोजना करून अ‍ॅक्‍शन प्लॅन तयार ठेवावा, असेही सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य विभागाला सूचित केले आहे. तर नागरिकांनाही नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Corona Update
सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीला भरपाईचे विघ्न !

लिक्‍विड ऑक्‍सिजन साठा करण्याचे 16 टॅंक

तिसऱ्या लाटेत ऑक्‍सिजन अभावी रुग्णांचे हाल होऊ नयेत, म्हणून जिल्ह्यात ऑक्‍सिजनचा पुरेसा साठा करण्याचे नियोजन सुरु आहे. जिल्ह्यात नव्याने 16 ऑक्‍सिजन टॅंक तयार केले जाणार आहेत. त्यानुसार करमाळा, पंढरपूर, अकलूज उपजिल्हा रुग्णालय, बार्शी, मंद्रूप, माढा, अक्‍कलकोट, मंगळवेढा, सांगोला येथील ग्रामीण रुग्णालय, मेडिकल कॉलेज, गुरुनानक चौकातील नियोजित महिला हॉस्पिटल, कंदलगाव, पुरंदावडे, कोंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे व महापालिकेच्या बॉईज व कामगार विमा रुग्णालयात ते टॅंक असतील, असेही सांगण्यात आले.

Corona Update
महिला संतप्त, रेशनसाठी अडविला धुळे-सोलापूर महामार्ग

जिल्ह्यात नऊ ऑक्‍सिजन निर्मितीचे प्लॅन्ट

जिल्ह्यात सद्यस्थितीत 63 मेट्रिक टन ऑक्‍सिजन साठविण्याची क्षमता असून ती वाढवून आता 81.42 मेट्रिक टनापर्यंत वाढविली जाणार आहे. तिसऱ्या लाटेत जिल्ह्याला 51 मे.टन ऑक्‍सिजन लागेल, असाही अंदाज आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात नऊ ठिकाणी नवे ऑक्‍सिजन निर्मितीचे प्लॅन्ट उभारले जाणार आहेत. तिथून 190 मे.टन ऑक्‍सिजन तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. करमाळा, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय, माळशिरस ग्रामीण रुग्णालय तर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात चार, कामगार विमा रुग्णालय आणि बॉईज हॉस्पिटलमध्ये हे प्लॅन्ट असतील, असे जिल्हा आरोग्य विभागाने सांगितले.

Corona Update
सोलापूर जिल्ह्यातील लस पुन्हा संपली !

संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी जिल्ह्यातील ऑक्‍सिजनची गरज भागविण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. हवेतून ऑक्‍सिजन निर्मितीचे प्लॅन्ट 15 ऑगस्टपर्यंत उभारून पूर्ण होतील. लिक्‍विड ऑक्‍सिजन टॅंक उभारण्यासाठी दोन महिन्यांचा कालवधी लागेल.

- डॉ. प्रदिप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.