घाणेगावातील सख्ख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू ! कुटुंब उघड्यावर

घाणेगावातील सख्ख्या भावांचा दहा दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झाला
Corona
CoronaCanva
Updated on

सोमा व रामा म्हणजे जणूकाही राम-लक्ष्मणाची जोडीच, अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती.

मळेगाव (सोलापूर) : बार्शी (Barshi) तालुक्‍यातील ग्रामीण भागात कोरोनाचा (Covid-19) उद्रेक झाला आहे. तालुक्‍यातील हळदुगे, घाणेगाव, झाडी, बोरगाव, मुंगशी, उपळे, पिंपरी येथे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूदरातही झपाट्याने वाढ झाली आहे. तालुक्‍यातील घाणेगाव येथील दोन सख्ख्या भावांचा दहा दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे कुटुंबच उघड्यावर आले असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (The two brothers in Ghanegaon died due to corona in ten days)

Corona
शहराला "ब्रेक द चेन'ची मदत मिळालीच नाही !

घाणेगाव येथील सोमनाथ हरी बचुटे (वय 39) व रामा हरी बचुटे (वय 37) या दोन भावांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऐन उमेदीच्या व कौटुंबिक जबाबदारीच्या कालावधीत घरातील दोन्ही कर्ते पुरुष गेल्याने बचुटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. सोमनाथ बचुटे यांच्यावर बार्शी येथे उपचार सुरू होते. 24 दिवस सोमनाथ बचुटे यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. डॉक्‍टरांनीही शर्थीचे प्रयत्न केले; मात्र उपचारास प्रतिसाद न दिल्याने 19 मे रोजी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. रामा बचुटे यांच्यावर खुलोरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, रावेत येथे उपचार सुरू होते. मात्र त्यांचाही 28 मे रोजी मृत्यू झाला. दहा दिवसांत एकाच कुटुंबातील दोन भावंडांचा मृत्यू झाल्याने घाणेगाव येथे शोककळा पसरली आहे.

Corona
शहर-जिल्ह्यात काय चालू व काय बंद ! वाचा सविस्तर

सोमा व रामा म्हणजे जणूकाही राम-लक्ष्मणाची जोडीच, अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. घाणेगावचे अल्पभूधारक शेतकरी रामहरी बचुटे व त्यांच्या पत्नी काविरा बचुटे यांच्या दोन्ही मुलांना काळाने हिरावून नेल्याने त्यांच्यापुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमनाथ हरी बचुटे यांच्या पश्‍चात पत्नी सोनाली बचुटे, मुलगी सायली बचुटे (वय 10), मुलगा सार्थक (वय 12) तर रामा हरी बचुटे यांच्या पश्‍चात पत्नी शोभा बचुटे, मुलगा ओंकार बचुटे (वय 13), वैभव बचुटे (वय 9) असा त्यांचा परिवार आहे. लहानपणीच मायेचं व कुटुंबाचं छत्र हरवल्याने बचुटे कुटुंबासमोर मुलांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आशा कठीण प्रसंगी बचुटे कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी व मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आनंद काशीद यांनी गावातील व समाजातील नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.