शहरातील बेरोजगार नागरिक आपल्या गावाकडे आली. परंतु या काळात सर्वात सकारात्मक गोष्टी घडल्या की गावातील नागरिकांच्या गरजा मोठ्या प्रमाणात गावातच भागवल्या जाऊ लागल्या.
सांगोला (सोलापूर) : कोरोनाच्या (Corona) महामारीमुळे लॉकडाउनच्या (Lockdown) काळात शहरातील अनेक उद्योगधंदे बंद पडले. अनेकजणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. या काळात मात्र खेडेगावातील नागरिकांच्या गरजा गावातच पूर्ण झाल्याने खेडी मात्र स्वयंपूर्ण बनलेली दिसून आली. लोकांना भाजीपाल्यापासून शेतीसाठीच्या वस्तू, खते, औषधे, बियाणे, किराणा माल, अंडी, मटण, फळे घरपोच तर मिळाली परंतु अनेकांना शेतीच्या कामांतुन, व्यवसायांतून रोजगार देखील मिळाला. या लॉकडाउनमध्ये 'गड्या आपला गावच बरा' अशी म्हणण्याची वेळ अनेकांवर आली. (the village has become self sufficient during the corona crisis)
कोरोना महामारीच्या संकटामुळे संपूर्ण जगच ठप्प झाले होते. आपल्या राज्यातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यामुळे प्रशासनाने कडक लोकडाउन केला होता. यामुळे अनेकांचे मात्र हाल झाले. व्यवसाय करून जगणाऱ्यांची उपासमार होऊ लागली. उद्योग-व्यापार संकटात सापडला. शहरातील बेरोजगार नागरिक आपल्या गावाकडे आली. परंतु या काळात सर्वात सकारात्मक गोष्टी घडल्या की गावातील नागरिकांच्या गरजा मोठ्या प्रमाणात गावातच भागवल्या जाऊ लागल्या.
एकमेकांच्या संपर्कातून शेतीत उपलब्ध असणाऱ्या फळे, पालेभाज्या एकमेकांना ताज्या मिळू लागल्या. तसेच ग्रामीण भागातील कोंबडी पालन असणाऱ्यांच्या घरातून चिकन व अंडी खरेदीची मोठ्या प्रमाणात विक्री होऊ लागली. या काळात नागरिकांना किराणामाल तसेच शेतीसाठी लागणारे खते, बियाणे, औषधे अनेक दुकानदार घरपोच करु लागले. या महामारीच्या काळातही शेतीची अनेक कामे सुरु असल्याने बेरोजगार झालेल्या अनेकजणांना गावातच थोडाफार का असेना रोजगार मिळाला. त्यामुळे या काळात नागरिकांच्या काही गरजा भागवण्यासाठी शहराकडे धाव घेतली जात होती. त्या गरजा गावातच एकमेकांच्या सहकार्याने पूर्ण होऊ लागल्या. गावात मटणासाठीची अगोदरच यादी करून त्याप्रमाणे ते घरपोच मिळू लागले. या महामारीच्या संकट काळात खेडी मात्र स्वयंपूर्ण बनलेली दिसून आली.
दुभत्या जनावरांचीही जागेवरच खरेदी-विक्री
लॉकडाउनच्या काळात जनावरांचा आठवडी बाजार बंद करण्यात आला होता. परंतु अशातही दुधासाठी दुभत्या जनावरांची खरेदी-विक्री खेडेगावात जागेवरच केली जात होती. सोशल मीडिया वरून अनेकजण विक्री व खरेदीसाठीच्या पोस्ट व फोटो टाकत असत. त्याप्रमाणे जवळच व खात्रीशीर दुभती गाई, शेळ्या, म्हशींची खरेदी-विक्रीही या खेडेगावात झालेली दिसून आली. मटणासाठीही गावातीलच बोकड खरेदी करून त्याचा वापर होत असल्याने त्याचीही विक्री जागेवरच होत होती.
महामारीचे संकट आणि महात्मा गांधीजींचा संदेश
'खेड्याकडे चला, खेडी स्वयंपूर्ण बनवा' असा संदेश महात्मा गांधीजी नेहमी देत होते. परंतु स्वातंत्र्यानंतर शहरीकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. कोरोना महामारीच्या संकटकाळात मात्र गांधीजींच्या विचारांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊन अनेक जण गावाकडे तर आलीच, परंतु त्यांच्या गरजा गावातच पूर्ण होऊ शकल्या त्यामुळे आपोआपच खेडी स्वयंपूर्ण बनली. (the village has become self sufficient during the corona crisis)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.