पोलिसांच्या सतर्कतेमुळे फुटली खुनाला वाचा ! चितेवरील मृतदेह काढून पोस्टमॉर्टेम

पोलिसांच्या सतर्कतेमुळे फुटली खुनाला वाचा ! चितेवरील मृतदेह काढून पोस्टमॉर्टेम
crime
crimesakal media
Updated on

पल्लवी हिचा मृतदेह चितेवर ठेवून अग्नी दिला आणि त्याच वेळी पोलिस व पोलिस पाटील घटनास्थळी दाखल झाले.

नातेपुते (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील (Malshiras Taluka) फोंडशिरस येथील मनोज पांडुरंग राऊत याने आपली पत्नी पल्लवी हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सासरच्या लोकांना कळविले आणि पोलिसांकडे फिर्याद दाखल न करता परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा पयत्न केला. पल्लवी हिचा मृतदेह चितेवर ठेवून अग्नी दिला आणि त्याच वेळी पोलिस (Police) व पोलिस पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चितेवरील अर्धवट जळालेला मृतदेह शवविच्छेदनासाठी नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर (Postmortem) खुनाचा खरा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, याप्रकरणी हवालदार नवनाथ माने यांनी फिर्याद दिली असून पल्लवीचा नवरा, दीर, आई व भावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या संशयित आरोपींना माळशिरस न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. (The wife died due to the beating but the husband conducted a mutual funeral)

crime
"पांडुरंग'चा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग !

फोंडशिरस येथील मनोज पांडुरंग राऊत हा व्यसनी असल्यामुळे त्याचे पत्नी पल्लवी मनोज राऊत (वय 28) हिच्याबरोबर अनेकदा भांडण झालेले होते. तिने एक वेळा विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दोन वेळा माहेरी निघून गेली होती. या दरम्यान 29 जून रोजी त्या दोघांचे भांडण झाले होते. या भांडणात पल्लवीला मारहाण करण्यात आली होती. त्यात तिचा मृत्यू झाला. पल्लवीचा नवरा मनोज राऊत याने खोटा बनाव तयार करून तिने साडीने गळफास घेतल्याचा देखावा निर्माण केला व तसे त्याने पल्लवीच्या सासरी दसूर (ता. माळशिरस) येथे कळविले. सासरवरून सुरेखा गौतम गवळी आणि विशाल गौतम गवळी हे आल्यानंतर ते दोघे व मनोज आणि त्याचा भाऊ श्रीकांत पांडुरंग राऊत अशा चौघांनी मिळून पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल न करता अंत्यविधी करण्याचा घाट घातला.

crime
विठ्ठल मंदिरातील शंभर वर्षांपूर्वीचे कान्होपात्राचे झाड नव्याने लावणार !

त्या वेळी लक्ष्मण भीमराव कुंभार यांनी फोंडशिरस बीटचे हवालदार नवनाथ बापू माने यांना वरील घटना सांगितल्यामुळे त्यांनी आणि पोलिस मसाजी थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चितेवरील प्रेत विझवले आणि तातडीने नातेपुते ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणला. डोक्‍याला मार लागल्यामुळे पल्लवीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल शवविच्छेदनामधून प्राप्त झाला आहे. दरम्यान, पोलिसी खाक्‍या दाखवताच मनोज राऊत याने मारहाणीत ती मरण पावल्याचे कबूल केले. याप्रकरणी हवालदार नवनाथ माने यांनी फिर्याद दिली असून पल्लवीचा नवरा, दीर, आई व भावाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या संशयित आरोपींना माळशिरस न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.