जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुनील अंकुश गुरव (रा. धोत्रे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
बार्शी (सोलापूर) : धोत्रे (ता. बार्शी) (Barshi) येथील भगवान बाबा मंदिराजवळ मोठमोठ्याने शिवीगाळ करून निघून गेल्यानंतर "पोलिसांना बोलावीन' असे पोलिस पाटील तरुणास म्हणताच मद्यधुंद तरुणाने त्यांच्यावर चाकूने छाती व पोटावर भोसकले (Crime). गंभीर अवस्थेत त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य एक जखमीवर बार्शीत अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, तरुणावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात (Barshi Taluka Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. सुनील अंकुश गुरव (रा. धोत्रे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून, जखमी प्रवीण सोनवणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस पाटील शाहीर दत्तात्रय जाधवर हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली.
जखमी सोनवणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील मारुती मंदिराजवळ रात्री साडेदहाच्या दरम्यान थांबलो असताना सुनील गुरव दुचाकीवरून शिवाजीनगर वस्तीकडे निघून गेला होता. त्या वेळी पोलिस पाटील जाधवर व मयूर लांडे तेथे आले. त्यांनी सुनील दिसला का? असे विचारले. पोलिस पाटील जाधवर यांनी, सुनील दारूच्या नशेत भगवान बाबा मंदिराजवळ मोठमोठ्याने आरडाओरड, शिवीगाळ करून निघून गेला आहे, त्याच्याकडे जाऊ, असे म्हणताच मी त्यांच्या सोबत गेलो. खामगाव रोडवरील मधुकर लांडे यांच्या वीटभट्टीजवळ सुनील गुरव दुचाकीवरून जाताना दिसला. त्या वेळी त्यास पोलिस पाटील जाधवर यांनी थांबवले व त्यास शिवीगाळ करू नको, असे सांगत असतानाच त्याने चाकू काढून जाधवर यांच्या पोटावर, छातीवर वार केले तर माझ्या मांडीवर वार केला.
या वेळी जखमी अवस्थेत पोलिस पाटील जाधवर गावाच्या दिशेने निघून गेले तर आम्ही दोघे दुचाकीवरून मधुकर लांडे यांच्या घरात कडी लावून बसलो. तेव्हा तेथे गुरव याने पाठलाग करीत येऊन शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन निघून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.