बूस्टर डोसचे जिल्ह्यात एकही केंद्र नाही! २३ लाख व्यक्तींनी संरक्षित डोस घ्यायचा कसा?

१८ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना खासगी लसीकरण केंद्रांवर बूस्टर (संरक्षित) डोस मिळणार असून त्यासाठी ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, शहर- ग्रामीणमध्ये सध्या एकही खासगी केंद्र सुरू नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल २३ लाख व्यक्तींना बूस्टर डोस घेण्यास अडचणी आहेत.
Sakal-Exclusive
Sakal-ExclusiveESAKAL
Updated on

सोलापूर : कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच आता प्रतिबंधित लसीकरणावर अधिक भर द्यावा, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. १८ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना खासगी लसीकरण केंद्रांवर बूस्टर (संरक्षित) डोस मिळणार असून त्यासाठी ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, शहर- ग्रामीणमध्ये सध्या एकही खासगी केंद्र सुरू नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल २३ लाख व्यक्तींना बूस्टर डोस घेण्यास अडचणी आहेत.

Sakal-Exclusive
मोठी बातमी! सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी सदावर्तेंना दिलासा; जामीन मंजूर

कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरण सुरू होऊन आता १५ महिने पूर्ण झाले आहेत. कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लसीचे पहिल्यांदा डोस घेणे आवश्यक आहे. तर १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी कोर्बोवॅक्स लस उपलब्ध झाली आहे. दरम्यान, १५ ते १७ वयोगटासाठी कोवॅक्सिन लसच टोचली जाते. १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती कोविशिल्ड तथा कोवॅक्सिन लस घेऊ शकते. जिल्ह्यात सध्या तीन लाख डोस इतकी लस शिल्लक आहे. शासकीय रुग्णालये अथवा शासकीय यंत्रणांद्वारे उभारलेल्या केंद्रांवर लसीचा पहिला व दुसरा डोस मोफत दिला जात आहे. तसेच ६० वर्षांवरील सर्वांनाच आणि फ्रंटलाइन वर्कर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना त्याच केंद्रांवर बूस्टर डोस मोफत दिला जात आहे. पण, १८ ते ५९ वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला संरक्षित डोस पैसे देऊनच घ्यावा लागणार आहे.

Sakal-Exclusive
विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं! पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर

२५० ते ४०० रुपयांत तिसरा डोस
कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा संरक्षित डोस घेताना त्यासाठी प्रत्येकी ७८० रुपये माजावे लागतील, असे सुरवातीला केंद्र सरकारने स्पष्ट केले. पण, एवढी मोठी किंमत देऊन सर्वच व्यक्तींना संरक्षित डोस घेता येणार नाही म्हणून त्याची किंमत प्रत्येकी २५० रुपये करण्यात आली. खासगी केंद्रांवरून ती लस टोचली जाणार असल्याने त्यासाठी आणखी १५० रुपये वाढीव द्यावे लागतील, असे जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

Sakal-Exclusive
मातोश्रीवर यायची कुणाची हिंमत नाही; मुख्यमंत्र्यांचा आक्रमक पवित्रा
  • लसीकरणाचे निकष...
    १) कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांनी घ्यावा दुसरा डोस
    २) कोवॅक्सिन लसीचा पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये किमान २८ दिवसांचे असावे अंतर
    ३) कोर्बोवॅक्स लसीच्या दोन्ही डोसमध्येही २८ दिवसांचाच असावा गॅप
    ४) प्रतिबंधित लसीचा बूस्टर डोस घेताना दोन्ही डोस घेऊन नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण व्हायला हवा

Sakal-Exclusive
उद्या दादरमध्ये येऊन दाखवा; किशोरी पेडणेकरांचे रवी राणा यांना आव्हान

बूस्टर डोससाठी २३ लाख लोक पात्र
जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील १६ लाख ७८ हजार ७०४ तरुणांना बूस्टर डोसची गरज आहे. दुसरीकडे ४५ ते ५९ वयोगटातील सहा लाख ६२ हजार ४५९ व्यक्तींना दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत. त्यांनाही बूस्टर डोस घ्यावा लागणार आहे. त्यांच्यासाठी अद्याप जिल्ह्यात एकही केंद्र नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Sakal-Exclusive
नारायण राणेंनी एकेकाळी ठाकरेंच्या घराबाहेर जागता पहारा दिला होता..

१८ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना संरक्षित डोस हा खासगी लसीकरण केंद्रांवरच मिळणार आहे. ६० वर्षांवरील व्यक्तींसह आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्स यांना शासकीय केंद्रांवर मोफत बूस्टर डोस मिळेल. खासगी केंद्रे लवकरच सुरू होतील.
- डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा समन्वयक, लसीकरण, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.