प्ले स्टोअरमधून हे ऍप्स इन्स्टॉल करून तरी पाहा...

 These apps from the Play Store Install and try ...
These apps from the Play Store Install and try ...
Updated on

लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियावर भरपूर प्रेझेंटी लावत आहात. त्यामुळं बोअर तर होणारच नां... कारण सगळीकडे थोड्याफार फरकाने त्याच त्या पोस्ट, तेच ते जोक्‍स अन्‌ तीच ती माहिती... या त्याच त्या पणापासून सुटकेसाठी काही नवे ऍप्स दिमतीला आले तर... हो, आज या कॉलममध्ये आपण अशा नव्याकोऱ्या ऍप्सविषयी माहिती घेणार आहोत. असे असंख्य ऍप्स असतात, जे की आपल्या कामाचे ठरू शकतात. पण त्याविषयी आपले अज्ञान असते. तेच दूर करण्यासाठी, त्या ऍप्सच्या माहितीविषयी आज फ्री लान्स इंजिनिअर संदीप पंढरपूरकर यांच्याशी संपर्क केला. 

याविषयी सखोल ज्ञान बाळगून असेलेल श्री. पंढरपूरकर म्हणाले, असे बरेचसे ऍप्स आहेत की जे आपल्या सर्व गरजा घरात बसून पूर्ण करू शकतात. मनोरंजन असो की आर्थिक व्यवहार, ज्ञान, माहिती मिळवणे असो की मित्र-मैत्रिणींशी गप्पाटप्पा मारणे असो... असा कुठलाही विषय असो. यासाठी आपल्या कामी ऍप्स येऊ शकतात. यातील काही ऍप्सची मी आपणास माहिती शेअर करतो.... 

अ) Zoom Cloud Meetings ः सध्याच्या "कोरोना'च्या महामारीच्या काळात सर्वांत जास्त लोकप्रियता मिळवलेलं हे अँड्रॉईड ऍप आहे. यामधे असलेले zoom pro ऑप्शनमुळे एकावेळेस जवळपास शंभरच्या आसपास लोक कॉन्फरन्समध्ये जोडली जाऊ शकतात आणि व्हिडिओ कॉलिंगद्वारे कॉन्फरन्स करू शकतात. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात या ऍपचा खूप उपयोग होऊ शकतो. कुटुंबातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येऊ शकतात, शिवाय मित्र आपल्या ऑफिसमधील सहकारी, कर्मचारी, सेल्समन, व्यापारी यांच्यात विनासंसर्ग छान संवाद साधू शकतात. दुसरे म्हणजे याच्यासारखी आणखी ऍप्स आहेत जसे की whatsapp video, google duo आहेत. पण झूम क्‍लाऊड मीटिंग ऍप इतकी कॉन्फरन्सला सदस्य जोडण्याची संख्या या ऍप्समध्ये नाही. 

ब) BHIM app ः हे भारत सरकारकडून म्हणजेच NPCI कडून राबवले गेलेले ऍप आहे. याचा फायदा असा की एखाद्या दुकानात अथवा हॉटेलमध्ये तसेच जिथे आपल्याला कॅशलेस व्यवहार करायचा आहे तिथे हे ऍप सर्वोत्तम आहे. यामुळे नोटा हाताळण्याचा संबंध येत नाही, संपर्क नाही. शिवाय व्यवहार पारदर्शक असल्यामुळे हिशोबाला सोपे असे हे ऍप आहे. हे ऍप वापरायला फारच सोपे आहे. दिवसाला आपण आपले डेबिट कार्ड लिंक करून 40 हजार रुपयांपर्यंत या ऍपद्वारे व्यवहार करू शकतो. याच्यासारखी phonepay, paytm, 
googlepay अशी बरीच ऍप आहेत पण BHIM app हे भारतीय बनावटीचे व पूर्ण भारतात चालणारे सर्वोत्तम ऍप आहे. 

क) BYJU`S ः सध्या कोव्हिड 19 सारख्या महामारीमुळे सर्व शाळा बंद आहेत, पण काही शाळांनी मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी या ऍपचा आग्रह धरला आहे, कारण BYJU`S ने काही काळासाठी त्यांच्या ट्युटोरियल्स फ्री केल्या आहेत. मुलांना सद्य परिस्थितीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात घरातच व्यस्त ठेवण्यासाठी या ऍपचा मोलाचा हातभार लागत आहे. बऱ्याच शाळा वरील ऍपद्वारे मुलांच्या अभ्यासाचा, सुटीतील प्रगतीचा पाठपुरावा घेत आहेत. याला प्रतिसाद पण छान मिळत आहे. 

ड) Hotstar, Netflix, Amazon ः सध्या लॉकडाउनमध्ये थिएटरमध्ये न जाता मनोरंजन करून घेता येते, बाजारात न जाताही गाण्याची cd घेता येते. अर्थात हे शक्‍य आहे Hotstar, Netflix, Amazon या ऍप्समुळे. थोड्याशा पैशांमध्ये आपण घरी बसून मोबाईल अथवा आपले गॅझेट टीव्हीला जोडून गाणी, व्हिडिओज अथवा नव्या सिनेमांचा आनंद घेऊ शकतो. यात एक गोष्ट छान आहे की घराबाहेर न पडता सगळ्या गोष्टी आपणास एकाच ठिकाणी मिळतात व आपण कोरोनाच्या महामारीपासून वाचू शकतो. 

इ) youtube ः गुगलचे यूट्यूब हे ऍप म्हणजे सर्व प्रकारच्या व्हिडिओजचे भांडार आहे. टेक्‍निकल व्हिडिओज, एखाद्या कंपनीच्या वस्तूंच्या कॅटलॉगचा व्हिडिओ, जुनी दर्दभरी प्रसिद्ध गाणी, पु.ल., व.पूं.सारख्या दिग्गजांच्या कथाकथनाच्या व्हिडिओंपासून एखाद्या ऍटोमोबाईल स्पेअर अथवा गाडीच्या सर्व्हिसिंगचा व्हिडिओ यासह खूप असे शैक्षणिक चित्रफितीपासून सर्व काही youtube सारख्या सागरात मिळते. एखादा व्हिडिओ आपणास ऑफलाइन पाहायचा असेल तर savefrom.net ही वेबसाइट फार उपयोगी पडते. यांच्या वेबसाइटवरूनच ऍप डाऊनलोड करता येते. ज्याच्यामुळे आपण youtube चे डाऊनलोड करता येण्यासारखे व्हिडिओ घेऊ शकतो. हे फार उपयुक्त ऍप आहे, पण काही कॉम्प्युटर अँटिव्हायरस प्रोग्राम या ऍप सपोर्ट करू देत नाहीत. (क्रमशः) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.