सोलापूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या सभांसाठी ‘हे’ नेते फायनल! पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर शहरात सभांचे नियोजन

माळशिरस, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य व पंढरपूर- मंगळवेढा या सहा विधानभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ५ नोव्हेंबरनंतर भाजपच्या केंद्रीय व राज्यातील नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत.
Narendra Modi Amit Shah Yogi Adityanath
Narendra Modi Amit Shah Yogi Adityanathesakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील माळशिरस, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य व पंढरपूर- मंगळवेढा या सहा विधानभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ५ नोव्हेंबरनंतर भाजपच्या केंद्रीय व राज्यातील नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत.

शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपचे देवेंद्र कोठे मैदानात असून शहर उत्तरमधून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या प्रचारासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हैदराबादच्या माधवी लता यांच्या जाहीर सभा सोलापूर शहरात होणार आहेत. याशिवाय पंढरपूर-मंगळवेढा, माळशिरस या मतदारसंघासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा नियोजित आहे.

सध्या सोलापूरचे स्थानिक नेते राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जाहीर सभांसाठी भाजपचे वरिष्ठ नेते यावेत, यासाठी प्रयत्न करीत आहेत. महायुतीच्या उर्वरित उमेदवारांपेक्षा भाजपच्या उमेदवारांना सर्वाधिक लाभ होईल, अशा मध्यवर्ती ठिकाणीच त्या नेत्यांच्या सभा होतील, असे नियोजन केले जात आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर कोणते नेते सोलापूर जिल्ह्यात सभेसाठी येणार व कोणत्या दिवशी त्यांची सभा घ्यायची हे नियोजन फायनल होणार आहे.

नेत्यांच्या सभा अन्‌ नियोजन

  • शहर मध्य, शहर उत्तर : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माधवी लता, पवन कल्याण

  • शहर मध्य, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट : मुरलीधर मोहोळ, देवेंद्र फडणवीस

  • पंढरपूर-मंगळवेढा, माळशिरस : पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व देवेंद्र फडणवीस

नेत्यांच्या सभा कधी घ्यायचे याचे नियोजन सुरु

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील भाजप महायुतीच्या उमेदवारासाठी प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हैदराबादच्या माधवी लता, अभिनेते पवन कल्याण (जन सेना पक्षप्रमुख), केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांच्या सभा नियोजित आहेत.

- नरेंद्र काळे, शहराध्यक्ष, भाजप, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.