Solapur News : ‘बीआरएसमध्ये गेलेल्यांना परतण्याची संधी’ - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

चार राज्यातील निवडणुकीचे निकाल भाजपला बळ देणारे
those who join brs they can come back chandrakant patil says politics
those who join brs they can come back chandrakant patil says politicsSakal
Updated on

सोलापूर : चार राज्यातील निवडणुकीचे निकाल भाजपला बळ देणारे आहेत. बीआरएसमध्ये गेलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचे पुन्हा भाजपमध्ये स्वागत करू व वाट चुकलेल्या मुलांना पुन्हा एकदा संधी देऊ, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

आपले बाळ वाट चुकत असेल तर, त्याला समजावून सांगून पुन्हा त्याला घरात घेतो त्याचप्रमाणे भाजपमधून नाराज होऊन बीआरएसमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा सन्मानाने भाजपमध्ये घेणार व पक्ष आणखी बळकट करणार, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

पालकमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता, पत्रकारांनी चार राज्यांच्या निकाल, तेलंगणामध्ये झालेल्या बीआरएसचा पराभव व त्या पक्षाचा महाराष्ट्रातील राजकीय प्रवास यावर प्रश्न उपस्थित केले.

तेलंगणामध्ये बीआरएसचा झालेला पराभव हा त्यांना मिळालेला जनतेचा कौल आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पक्षातून गेलेल्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. भाजपमधून जे कार्यकर्ते नेते बीआरएसमध्ये गेले आहेत, त्यांना पुन्हा एकदा भाजपमध्ये संधी देणार आहे. त्याचप्रमाणे इतर कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागतच आहे असे स्पष्ट केले.

मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या ठिकाणी जनतेने स्पष्टपणे भाजपला बहुमत दिलेले आहे. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जाते. आजही मोदींचे नेतृत्व हेच देशासाठी आवश्यक आहे तसा स्पष्ट संकेत या निवडणुकीतून मिळालेला आहे.

those who join brs they can come back chandrakant patil says politics
Solapur: अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा विविध प्रश्नांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा

यापुढे देखील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुका होणार व त्यात भाजप जिंकणार असा आत्मविश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पालकमंत्र्यांनी सांगितला सर्व्हेक्षणाचा किस्सा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आजही कायम असून, यासंदर्भात पुण्याच्या कोथरूड भागात केलेले सर्व्हेक्षण व त्यातील निष्कर्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यातून मोदींचा प्रभाव आजही कायम आहे व पुढील निवडणुकीत पुन्हा यश मिळवणार असे स्पष्ट केले.

भाजपच्या तीन राज्यातील यशाबद्दल विचारले असता, त्यावर त्यांनी या यशात पंतप्रधान मोदींचा वाटा मोठा असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे आजही मोदींच्या विरोधात बोललेले कुणालाही चालत नाही याचे उदाहरणासह स्पष्ट केले.

पाटील यांनी स्वतः कोथरूड भागामध्ये कार्यकर्त्यांना सर्वेक्षण करायला सांगितले. विविध दुकानात जाऊन मोदी यांच्याबद्दल नकारात्मक बोला व त्यातून जे येईल ते नोंद घ्या असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

those who join brs they can come back chandrakant patil says politics
Solapur Child Marriage : बालविवाहाप्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा; मोहोळ ग्रामीण रुग्णालयात प्रकार उघडकीस

शंभर पैकी ९८ ठिकाणी त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. ९८ टक्के ठिकाणी मोदींच्या विरोधात बोललेले लोकांनी खोडून काढले. मोदींच्या कामाची पद्धत व त्यांचा प्रभाव स्पष्ट होतो असे पाटील यांनी सांगितले.

निवडणुका संपल्या म्हणून विरंगुळ्यासाठी परदेश प्रवासाला न जाता, मोदींनी पुन्हा नव्याने काम सुरू केले आहे. ही त्यांची राष्ट्राप्रती असलेली प्रतिबद्धता आहे.

उत्तर भारतातील निवडणुकीच्या निकालातून मोदींच्या नेतृत्वाबद्दल पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. यापुढेही मोदींची घोडदौड सुरूच राहील व देशाला लोक कल्याणकारी सरकार मिळेल, याबाबत शंका नाही असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.