रेमडेसिव्हीरचा काळाबाजार ! तिघे पोलिसांच्या जाळ्यात; सलग दुसऱ्या दिवशी कारवाई

रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनचा काळाबाजारात विक्री करणाऱ्या तिघांना अकलूजमध्ये अटक
Remdesivir
RemdesivirCanva
Updated on

श्रीपूर (सोलापूर) : रेमडेसिव्हीर (Remdesivir) इंजेक्‍शनचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना गुरुवारी अकलूज पोलिसांनी रंगेहाथ पकडले. मेडिकल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकलूज शहरात सलग दुसऱ्या दिवशी अशी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. योगेश दिलीप शिंदे, सागर संजय थोरात (दोघेही रा. अकलूज), जानिसार मिराज मुलाणी (रा. राउतनगर- अकलूज) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. औषध निरीक्षक नामदेव भालेराव यांनी याबाबत पोलिसात तक्रार नोंदविली आहे. (Three arrested for selling remdesivir injections black market in Akluj)

सध्या कोरोना (Covid-19) रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे समाजमन धास्तावले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना स्वतःच्या पातळीवर रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन उपलब्ध करण्याबाबत डॉक्‍टर मंडळी सांगत आहेत. इंजेक्‍शनची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत असल्याने हे इंजेक्‍शन मिळवताना रुग्णाच्या नातेवाइकांची दमछक होत आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे रेमडेसिव्हीरचे वितरण व नियंत्रण याची जबाबदारी असली तरी तेथे कमालीची अनास्था आहे. उपविभागीय अधिकारी भेटत नाहीत. फोन घेत नाहीत आणि त्यांच्या कार्यालयात कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याची सार्वत्रिक ओरड आहे.

Remdesivir
शहर-जिल्ह्यात उद्यापासून मेडिकल, बॅंकांशिवाय सर्वकाही बंद !

या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काहीजण रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन चढ्या दराने काळ्या बाजारात विक्री करीत आहेत. काळ्या बाजारातील एका इंजेक्‍शनसाठी 35 ते 40 हजार रुपये मोजावे लागत आहेत. एका रुग्णाला सहा इंजेक्‍शनचा डोस देण्याची गरज असल्याचे डॉक्‍टर सांगत आहेत. काळ्या बाजारातील दर पाहता सहा इंजेक्‍शन मिळविणे आणि त्यासाठी दोन ते अडीच लाख रुपयांची तरतूद करणे सामान्य माणसाच्या आवाक्‍याबाहेरचे आहे. या परिस्थितीत रुग्ण व नातेवाईक अक्षरशः हतबल झाले आहेत. तर अवैध मार्गाने रेमडेसिव्हीरची विक्री करणाऱ्या मंडळींनी उच्छाद मांडला आहे.

पोलिसांनी बुधवारी (ता. 5) तिघांना व गुरुवारी (ता. 6) आणखी तिघांना रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन विकताना रंगेहाथ पकडले आहे. योगेश शिंदे, सागर थोरात हे जुन्या बस स्टॅंडच्या आवारात 45 हजार रुपयांना रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन विक्री करताना सापडले आहेत. तर, जानिसार मुलाणी याला राऊतनगर येथील मंगल कार्यालयाच्या गेटजवळ 40 हजार रुपयांना इंजेक्‍शन विक्री करत असताना पकडण्यात आले आहे.

Remdesivir
गुरुवारी कोरोनामुळे 53 जणांचा मृत्यू ! एकाच दिवशी आढळले 2117 नवे रुग्ण

सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका शिंदे, एएसआय बबन साळुंखे, बाळासाहेब पानसरे, श्रीकांत निकम, पोलिस अंमलदार रामचंद्र चौधरी, सुहास क्षीरसागर, विक्रम घाटगे, मंगेश पवार, विशाल घाटगे, जमीर शेख, विश्वास शिनगारे, नीलेश काशीद, अमोल मिरगणे, अमितकुमार यादव, सुभाष गोरे, संदेश रोकडे, प्रवीण हिंगणगावकर, पांडुरंग जाधव, नाजनीन तांबोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर हे पुढील तपास करीत आहेत.

या व्यक्तींनी ही इंजक्‍शन्स कोणत्या दवाखान्यातून किंवा मेडिकलमधून आणली आहेत? काळ्या बाजारात विक्रीसाठी इंजेक्‍शन पुरविणारा खरा सूत्रधार कोण आहे? हे तपासात लवकरच उघड होईल.

- अरुण सुगावकर, पोलिस निरीक्षक, अकलूज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.