संपूर्ण वर्षाभरात गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळी पाडवा या तीन मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी होते. या तीन दिवसांमध्ये दुचाकी, मोपेड, स्कूटर या सर्वप्रकारचे साधारण आठ हजार वाहनांची खरेदी होते. तर सर्व प्रकारच्या चारचाकी बुकिंग होणाऱ्या वाहनांच्या संख्या साधारण ९०० ते १२०० इतकी आहे. केवळ तीन मुहूर्तावर साधारण २०० कोटींची उलाढाल होते.