Solapur : तीन लाख महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत; ‘उज्ज्वला’चे १.६७ लाख तर ‘लाडकी बहीण’मधील दोन लाख लाभार्थी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना (एका कुटुंबातील एकच) देखील आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत.
three gas cylinders free every year to three lakh women Ujjwala and Ladki Bahin beneficiaries
three gas cylinders free every year to three lakh women Ujjwala and Ladki Bahin beneficiariessakal
Updated on

सोलापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना (एका कुटुंबातील एकच) देखील आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. त्यात उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थी महिलांसह मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचाही समावेश आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे तीन लाख महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थींना गॅस एजन्सीधारकाकडून रोख पैसे देऊन ८३० रुपयांचा गॅस सिलिंडर विकत घ्यावा लागेल. त्यानंतर केंद्र सरकारकडून ३०० रुपयांची सबसिडी तर उर्वरित ५३० रुपये राज्य शासनाकडून त्या लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा होतील. एका वर्षात कितीही गॅस सिलिंडर विकत घेतले, तरीदेखील दरवर्षी केवळ तीन गॅस सिलिंडरच त्या महिलांना मोफत मिळणार आहेत.

दरम्यान, जिल्ह्याच्या अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी ‘उज्ज्वला’ योजनेतील एक लाख ६७ हजार लाभार्थींची यादी तयार ठेवली आहे. आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांची यादी त्यांना मिळाल्यानंतर दोन्हीकडे एकच लाभार्थी असलेल्यांची यादी निश्चित होईल. त्यानंतर अंतिम यादी शासनाला सादर करून त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

three gas cylinders free every year to three lakh women Ujjwala and Ladki Bahin beneficiaries
Solapur : सोलापूर बाजार समिती निवडणूकीत अशासकीय सदस्यांआडून कुरघोड्या

‘लाडकी बहीण’साठी सहा लाख अर्ज; संभाव्य पात्र अवघे नऊ हजारच

जिल्ह्यातील पाच लाख ९२ हजारांहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत अर्ज केले आहेत. योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत असल्याने अर्जांची संख्या आणखी वाढणार आहे.

पण, तालुकास्तरीय समित्यांकडून ‘नारीशक्ती दूत’ ॲपवर अपलोड झालेल्या सर्व अर्जांची पडताळणी करून संभाव्य पात्र महिलांची यादी जिल्हास्तरावर पाठवायची आहे. ५ ऑगस्टपर्यंत अंतिम यादी शासनाला सादर करायची आहे. तरीपण, आतापर्यंत केवळ नऊ हजारांपर्यंतच संभाव्य पात्र लाभार्थींची यादी जिल्हास्तरावर आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

three gas cylinders free every year to three lakh women Ujjwala and Ladki Bahin beneficiaries
Solapur Railway Station: सोलापूर रेल्वेस्‍थानकाला फाईव्ह स्टार लूक; अमृत योजनेतून विभागात ४६५ कोटींची कामे

दोन्ही योजनांची स्थिती

  • ‘उज्ज्वला’चे लाभार्थी - १.६७ लाख

  • ‘लाडकी बहीण’चे अर्ज - ५.९२ लाख

  • ‘लाडक्या बहिणी’चे संभाव्य पात्र - ९,०००

  • अर्जांच्या पडताळणीची मुदत -५ ऑगस्टपर्यंत

जिल्ह्यात उज्ज्वला गॅस योजनेचे एक लाख ६७ हजार लाभार्थी आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत उज्ज्वला गॅस योजनेतील महिलांनी देखील अर्ज केले आहेत. त्यामुळे जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांकडून आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थींची यादी प्राप्त झाल्यावर त्याची पडताळणी होईल. त्यानंतर अंतिम पात्र यादी शासनाला सादर केली जाणार आहे. त्यानुसार संबंधित कुटुंबातील पात्र महिलांना दरवर्षी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून तीन गॅस सिलिंडर मोफत मिळतील.

- ओंकार पाडोळे, अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.