सोलापूर - येथील बाजार समितीत भाज्यांची आवक वाढल्याने टोमॅटोचे भाव आवक नसताना देखील उतरले आहेत. पुढील पंधरवड्यात बारामती व विजयपूर भागातून टोमॅटोची आवक वाढणार असल्याचे यार्डातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
मागील दोन महिन्यात पावसाअभावी सर्वच भाज्यांची आवक घटलेली होती. त्यातच टोमॅटोची आवक सर्वात कमी असल्याने भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. इतर भाज्यांची आवक नसल्याचादेखील परिणाम या स्थितीमागे होता.
त्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने भाज्यांची लागवड वाढली. कमी कालावधीत येणाऱ्या पालेभाज्या बाजारात येऊ लागल्या. तसेच फळभाज्यांची आवक सुरु झाली आहे. त्यांची आवक वाढली आहे. त्या तुलनेत टोमॅटोची आवक अजूनही मर्यादित आहे. पण इतर भाज्यांची आवक वाढल्याने टोमॅटोची मागणी कमी झाली.
प्रत्यक्षात टोमॅटोची आवक आजही मर्यादित असून भाव मात्र उतरले आहेत. पुढील पंधरवड्यात विजयपूर व बारामती भागातून टोमॅटोची आवक वाढणार आहे. तसेच स्थानिक भागातील आवक देखील वाढण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीत टोमॅटोचे भाव ४० ते ५० रुपयांवर आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.