ग्रामीण ढंगातील कृषी उपक्रमांमुळे बासलेगावच्या कृषी पर्यटन केंद्राकडे पर्यटकांचा ओढा

ग्रामीण ढंगातील कृषी उपक्रमांमुळे बासलेगावच्या कृषी पर्यटन केंद्राकडे पर्यटकांचा ओढा
Updated on
Summary

बासलेगाव येथील दिशा कृषी पर्यटन केंद्र हे निश्चितच कृषी उद्योगाला पर्यटनास जोड कशी द्यावी, याचे एक उत्तम उदाहरण म्हणून पाहिले जात आहे.

अक्कलकोट (सोलापूर) : श्री स्वामी समर्थ मंदिर हे अक्कलकोट येथील धार्मिक पर्यटन केंद्र आहे. त्या जोडीला आता बासलेगाव ता.अक्कलकोट येथील दिशा कृषी पर्यटन केंद्र (Direction Agri-Tourism Center) हे निश्चितच कृषी उद्योगाला पर्यटनास जोड कशी द्यावी, याचे एक उत्तम उदाहरण म्हणून पाहिले जात आहे. गळोरगी तलावाच्या चारही बाजूला डोंगराच्या कपारी त्यात मध्यभागी पूर्ण पाण्याने भरलेला तलाव म्हणजे निसर्ग सौंदर्याचा खजिनाच होय. (Tourists are attracted to the agri tourism center of baslegaon)

ग्रामीण ढंगातील कृषी उपक्रमांमुळे बासलेगावच्या कृषी पर्यटन केंद्राकडे पर्यटकांचा ओढा
लसीसाठी सोलापूर वेटिंगवरच ! लसीअभावी 339 केंद्रे बंद

तिथेच बाजूला हाजी नसरोद्दीन मुतवल्ली व त्यांची दोन कर्तबगार मुले एजाज आणि इम्रान यांनी काळाची गरज ओळखत, आपल्या स्वतःच्या बावीस एकर क्षेत्राला आता कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले आहे. संपूर्ण सेंद्रिय नैसर्गिक शेती आणि स्वतःचा 40 टन क्षमतेचा गांडूळ खत प्रकल्प याचा पुरेपूर वापर करीत शेती ही बहरवली आहे. आता येथे शेकडो पर्यटक भेट देऊन ग्रामीण ढंगातील निसर्गसंपन्न शेती अनुभवून हरखून जात आहेत. या ठिकाणी सध्या उपलब्ध असलेल्या गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत. ज्यात 250 नारळ झाडे, 2.5 एकर साईसरबत्ती लिंबू बाग, 2 एकर यूएनआर थाई पेरू बाग, एक एकर एनएमके गोल्डन सीताफळ बाग, एक एकर हंपीचे सोनकेळ तसेच आंबा, चिंच व कडुलिंब यांची मोठी पन्नास एक झाडे यासह अंजीर, चिक्कू, डाळींब, संत्रा, जांभळं, कवट याची झाडे भरपूर आहेत.

याच्या जोडीला तुळस, गवतीचहा, पुदीना, अडुळसा, अलुवेरा आदी औषधी वनस्पती सुद्धा येथे मोठ्या प्रमाणावर आहेत. याला सोडून रासबेरी, आवळा, ऍपल बोर, जवारी बोर झाडे सुद्धा आहेत. याला जोडून पंढरपूरी म्हशी, जवारी गाई व कोंबडी सुद्धा याठिकाणी आहेत. संपूर्ण शेतातील बांधांवर केशर व हापूस आबे लावले गेले आहेत. याशिवाय समोरच्या डोंगरावरील शेतीत आता 500 नारळ, 500 सागवान तसेच 500 खजूर झाडे येत्या थोड्या दिवसात लावली जाणार आहेत. यामुळे या दिशा कृषी पर्यटन केंद्रावर दिवसेंदिवस नागरिकांची गर्दी विरंगुळा म्हणून जास्त होत आहे. ग्रामीण ढंगातील निसर्गरम्य वातावरण हे त्यांना आनंद देऊन जात आहे. या परिसरात तलावामुळे मोर, हरीण व कोल्हे यांचा सतत नैसर्गिक वावर सुद्धा होत असतो.

ग्रामीण ढंगातील कृषी उपक्रमांमुळे बासलेगावच्या कृषी पर्यटन केंद्राकडे पर्यटकांचा ओढा
रेमडेसिव्हिरच्या तुटवड्याचे खापर सोलापूर प्रशासनाने फोडले रुग्णांच्या माथ्यावर 

काम पूर्ण झाल्यानंतर येथे मिळणाऱ्या आणखी सोयी

- दोन घोड्याच्या माध्यमातून सैर घडविली जाणार

- सागवानी बैलगाडीतून शिवारात फेरफटका

- पर्यटकांना राहण्यास तंबू व सर्व सुखसोयींनी समृद्ध राहायला 10 वूडन कॉटेजेस

- पॉलीहौऊसची निर्मिती

- शेततळी करून मत्स्यपालन करणार

- उसाचे रस काढायचे मशीन सुद्धा तयार

- लहान मुलांना पोहोण्यास डुंबण तलाव

- शेताबाजूला असलेल्या ओढ्यावर विश्रांती कक्ष व त्याखाली झुलता पाळणा सोय

ग्रामीण ढंगातील कृषी उपक्रमांमुळे बासलेगावच्या कृषी पर्यटन केंद्राकडे पर्यटकांचा ओढा
पुणे, सोलापूर, नगरसाठी रोहित पवारांनी दिले मोफत रेमडेसिवीर

दरवर्षी मोफत हुरडा खाऊ घालतात

बासलेगाव येथील एजाज मुतवल्ली यांनी दरवर्षी हुरडा मौसमात वेगवेगळ्या प्रकारची लुसलुशीत हुरडा प्रकार दररोज दोनशे जण याप्रमाणे सलग दोन महिने जवळपास अनेक कुटूंबियासह 6000 जणांना मोफत हुरडा खाऊ घालतात आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात एक दिवस घालविण्याचा आनंद देतात

अक्कलकोटमध्ये येणारे भाविक स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर काय करायचे असा विचार करत होते. पण संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने केलेली शेती आणि त्यात केलेल्या आणि येत्या काळात सुरू असलेली कामे पाहिल्यास निश्चितच प्रत्येक जण दोन दिवस विश्रांतीस येथे राहणारच यात शंका नाही. या ठिकाणी सर्व ग्रामीण शैलीला आधुनिकतेची जोड देऊन केलेल्या उच्च दर्जाच्या सुविधा पाहून प्रत्येक जण आनंदी होईल एवढे निश्चित आहे.

- एजाज मुतवल्ली, बासलेगाव

(Tourists are attracted to the agri tourism center of baslegaon)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.