बार्शी (सोलापूर) : मागील वर्षी कोरोना संसर्गाने संपूर्ण राज्यात थैमान घातले असताना, सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळले होते अन् मृत्यूही झाले होते. सलग दुसऱ्या वर्षी दुसऱ्या टप्प्यात तालुका पुन्हा कोरोना रुग्णांचा हॉट स्पॉट बनला असून, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यात एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात हाय रिस्क व लो रिस्क असे एकूण 12 हजार 386 रुग्ण आहेत. हे प्रमाण 30 टक्के आहे तर 593 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
बार्शी शहर, वैराग, चिखर्डे, पांगरी, आगळगाव, पानगाव, गौडगाव, तडवळे, उपळे दुमाला, ग्रामीण रुग्णालय, खासगी हॉस्पिटल येथे 7 हजार 720 जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट केली असता 449 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याच ठिकाणी 576 जणांची स्वॅब घेऊन तपासणी केली असता 44 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर आठ दिवसांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. शहर अन् तालुक्यात हाय रिस्कमध्ये 7 हजार 327 जण तर लो रिस्कमध्ये 5 हजार 59 जण आढळले आहेत. एकूण 12 हजार 386 आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष गायकवाड यांनी दिली.
बार्शी शहरात भूम, परांडा, कळंब, येरमाळा, वाशी, माढा, उस्मानाबाद येथील तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असून, रुग्णांवर उपचार करणे अवघड होत आहे. पाच कोव्हिड केअर सेंटर, अनेक रुग्णालये, खासगी हॉस्पिटल येथे ऑक्सिजनसह बेडची व्यवस्था केली तरी अपुरी पडत आहे. आणखी रुग्ण वाढल्यास आरोग्य विभागासमोर मोठा प्रश्न उभा राहणार आहे.
बार्शीत एका आठवड्यात दोन वेळा आढावा बैठक घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. खासगी रुग्णालय, हॉस्पिटल येथे ऑक्सिजन बेडची वाढीव व्यवस्था केली आहे तर पालिकेच्या वतीने जवाहर रुग्णालय येथे सोय करण्यात येत आहे. तालुक्यात दररोज 3 हजार टेस्ट घेण्याची यंत्रणा राबवणार आहोत.
- हेमंत निकम,
प्रांताधिकारी, सोलापूर
बार्शीला नाही पूर्णवेळ तालुका वैद्यकीय अधिकारी
बार्शी कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट बनत असताना, तालुक्यासाठी पूर्णवेळ तालुका वैद्यकीय अधिकारी नाही. माढा - बार्शी अशा दोन तालुक्यांचा कार्यभार डॉ. संतोष गायकवाड यांच्याकडे आहे, असे प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्याकडे विचारणा केली असता, हा विषय माझा नाही, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारीतील आहे, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.