गायन अन् चित्रकला या दोन्ही कलाक्षेत्राचा अभ्यास करत या कलांना पूरक असे ग्राफिक डिझाईनमध्ये अपूर्वा शहाणे यांनी करिअर करत असताना विद्यार्थ्यांना कला गुणांचे शिक्षण देण्याचे कार्य सुरु ठेवले आहे..अपूर्वा शहाणे या ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थिनी आहेत. लहानपणी त्यांनी घरात रांगोळी काढण्यातून चित्रकलेची सुरवात केली. तर वडील उन्मेष शहाणे यांनी त्यांना दुसरीपासूनच शास्त्रीय संगीताची शिकवणी लावली. शाळेत चित्रकलेच्या तासात शिक्षकांनी त्यांची कला हेरली. तीला अनेक फॉर्ममध्ये चित्रे काढण्यास शिकवली. सुस्पष्ट आवाजाने अपूर्वाला शाळेत प्रार्थना गायनाची संधी मिळाली. स्नेह संमेलनातून तीच्या कलांचा विकास झाला.नंतर कलेची आवड असूनही अपूर्वाने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचे नसले तरी कुठेतरी कलेशी संबंधित करिअर विज्ञानशाखेतून मिळेल ही अपेक्षा होती. त्यामध्ये आर्किटेक्ट व ग्राफिक डिझाईन हे अभ्यासक्रम उपयुक्त होते..Solapur Picnic Point : सोलापूरकरांना पिकनिक पॉइंट खुले होण्याची प्रतीक्षा.आर्किटेक्ट विषयात चित्रकला फारशी प्रभावी ठरणार नाही. त्यासाठी तिने ग्राफिक डिझाईन अभ्यासक्रमाची निवड केली. त्यात थीम बेस्ड डिझाईन विषयात त्यांची चित्रकला चांगलीच फुलली. पेंटिंग व क्राफ्ट डिझाईन हे तिचे आवडते विषय राहीले.पदवी शिक्षण झाल्यानंतर त्यांना एका स्टार्टअपमध्ये नोकरीची संधी मिळाली. तेथे त्यांनी व्हीडीओ निर्मिती, पोस्टर निर्मिती व ॲनिमेटेड वर्कचे नवे फॉर्म हाताळत त्यावर स्वतःची मोहर उमटवली आहे. तसेच कलेचा वारसा इतरांना मिळावा यासाठी त्या इतर विद्यार्थ्यांसाठी कला प्रशिक्षणे घेत असतात. ठळक बाबीएकाच वेळी चित्रकला व गायन कलेची जोपासनाकलेला ग्राफिक डिझाईन करिअरची जोडकमर्शिअल आर्टसचे स्टार्टअप ॲक्टिव्हिटीविविध कलाप्रकारांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण.करिअर वगळून अन्य कलात्मक निर्मितीसाठी कार्यविद्यार्थ्यांना कलेचे शिक्षणगायन कला विविध प्रकारांमध्ये सादर करण्याचा मानस. कलेतून करिअर करत असताना सातत्याने मी कलेच्या विकासाकडे लक्ष दिले. पुढेही करिअरची व्यावहारिक वाट चोखाळून मुक्त चित्रकलेतून होणारी अभिव्यक्तीला कायम प्राधान्य देणार आहे.- अपूर्वा शहाणे, ग्राफिक डिझायनर, सोलापूर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.