राज्यात कोरोनाचा कहर अद्यापही सुरूच आहे. दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर असतानाच तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उ. सोलापूर (सोलापूर): राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या गुरुजींच्या बदल्या तूर्तास लांबणीवर पडल्या आहेत. जोपर्यंत शाळा सुरू होत नाहीत तोपर्यंत बदल्या न करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने आज घेतला आहे.
राज्यात कोरोनाचा कहर अद्यापही सुरूच आहे. दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर असतानाच तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पहिली ते सातवीचे वर्ग अद्यापही शासनाने सुरू केलेले नाहीत. सध्या आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. साधारणपणे जिल्हा परिषदेच्या शाळा पहिली ते सातवीपर्यंतच आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील अशा शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. शाळा सुरू नसल्यामुळे गुरुजींच्या बदल्यांचा विषयही तूर्तास थांबविण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा जरी बंद असल्या तरी गुरुजी रोज शाळेत जात आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. मात्र बदल्यांचा विषय पुढे ढकलल्याने अनेक गुरुजींना दिलासा मिळाला आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय यापूर्वीच्या सरकारने घेतला होता. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शिक्षकांच्या बदल्या या मे महिन्यामध्ये केल्या जात असायच्या. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या बदल्या अद्यापही केलेल्या नाहीत.
शाळा कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता
जिल्हा परिषदेच्या शाळा कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता कायम आहे. कोरोनाचा संसर्ग जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत शाळा सुरू करण्याचा धाडसी निर्णय सरकार घेणार नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षीही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.