दिवाळीच्या उत्सवात ग्रामीण भागातील प्रत्येक कलावंत व कारागिरांच्या हातावर कमाईचा पैसा जायला हवा. दिवाळीची ही संवेदनशीलता प्रत्येकाने जपायला हवी या आशयाचे मिम्स ट्रेंड सोशल मीडियावर सुरू आहेत..दिवाळीचा सण हा आनंदाचा उत्सव आहे. त्याला शेती व ग्रामीण कारागिरांचे अर्थकारण फार मोठ्या प्रमाणात जोडले गेले आहे. दिवाळीचे चारही दिवस या पध्दतीने बाजारपेठेत प्रत्येकाच्या वाट्याला दिवाळीचा आनंद जावा यासाठी सोशल मीडियावर अनेक संदेश दिसू लागले आहेत.चिनी बाजारातील रंगीबेरंगी पण कृत्रिम दिवे व राजस्थानातून आलेले मातीचे दिवे दिसून येतात. पण स्थानिक माती कारागिरांनी दोन महिन्यापासून जय्यत तयारी करत दिवे तयार केले आहेत. या दिव्यांच्या विक्रीतून आलेल्या कमाईतून त्यांची दिवाळी साजरी होणार आहे. याबाबत काही व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाले आहेत.दिवाळीसाठी फुल उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड केली आहे. अनेक वेळा मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्याने झेंडूचे भाव कोसळतात. केवळ दिवाळीच्या खर्चासाठी केलेली झेंडूची लागवड तोट्यात गेल्यावर उत्पादकांची दिवाळी कशी होणार हा प्रश्न असतो. त्यामुळे झेंडूची फुले अभियानाच्या माध्यमातून झेंडू फुलांची नागरिकांनी भरपूर खरेदी करताना त्याचा भाव किमान ७० रुपये किलोपेक्षा कमी येऊ नये याची काळजी घ्यायला हवी. तरच उत्पादकांना दिवाळीचा आनंद घेता येणार आहे. याबाबतचे संदेश माध्यमावर व्हायरल झाले आहेत. याच पद्धतीने लक्ष्मी पूजनाच्या साहित्याच्या खरेदीवर देखील संदेश येत आहेत..दिवाळीत सर्वात मोठा प्रकार चीनी वस्तूंच्या धोका कायम असतो. यावेळी प्लास्टीकचे आकाशदिवे, आकर्षक दिवे, रंगीत व चमकणारे दिवे, सजावट केलेले दिवे, पाण्यातील दिवे, कोणतीही गॅरंटी नसलेले दिवे, दिव्याच्या माळा अशा अनेक वस्तूंच्या खऱेदीवर बहिष्काराची जागरुकता सोशल संदेशातून व्यक्त केली गेली. या उलट कामटीपासून केलेले पारंपरिक आकाशदिवे, कागदी आकाशदिवे यांची खरेदी करण्याची गरज आहे.महिलांकडून देखील घरातील कामगारासह फराळ विक्री करणाऱ्या महिलांच्या साहित्याची खरेदी केली जाते. दिव्यांग व अंध मुलांनी तयार केलेल्या वस्तुंची खरेदी देखील करण्याचे भावनिक मेसेज दिसत आहेत.झेंडू उत्पादक बाजारात स्वतः माल आणतात तेव्हा फुलाला चांगला भाव देत असताना ते भाव पाडण्याचा प्रयत्न नागरिकांनी करू नये. तसेच स्थानिक कारागिरांनी केलेले मातीचे दिवे वापरायला हवे. वडीलधाऱी माणसे ही नेहमी कष्टकरी व कारागिरांना दिवाळी वाटा मिळावा यासाठी आग्रह करत तो खरा मानला पाहिजे.- महेश कासट, श्रीमंत योगी प्रतिष्ठान, सोलापूर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.