सोलापूर बार असोसिएशनसाठी तिरंगी लढत! २९ एप्रिलला मतदान तर ३ मे रोजी मतमोजणी; १ मे रोजी ‘या’ कार्यक्रमासाठी सहा न्यायमुर्ती सोलापुरात

सोलापूर वकील संघाच्या निवडणुकीसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अध्यक्षपदाचे उमेदवार ॲड. एस.आर. रेशमे व सहसचिव पदाचे उमेदवार ॲड. नरेंद्रकुमार गावडे यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.
sakal
advocatesolapur
Updated on

सोलापूर : सोलापूर वकील संघाच्या वार्षिक निवडणुकीसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख होती. अध्यक्षपदाचे उमेदवार ॲड. एस.आर. रेशमे व सहसचिव पदाचे उमेदवार ॲड. नरेंद्रकुमार गावडे यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.

बार असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव व खजिनदार, अशा पाच पदांसाठी १९ जण निवडणूक लढवणार आहेत. तीन पॅनेल तयार झाले असून प्रचारालाही सुरवात झाली आहे. ॲड. अमित आळंगे याचा विधी सेवा पॅनेल, ॲड. एस. व्ही‌. उजळंबे यांचा विधी सेवा व्यासपीठ आणि ॲड. राजेंद्र फताटे यांचा परिवर्तन पॅनेल या निवडणुकीत आहे. बार असोसिएशनसाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे.

सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या पायाभरणी समारंभासाठी १ मे रोजी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय सोलापुरात येणार आहेत. त्यावेळी अन्य पाच न्यायमूर्तींचीही उपस्थिती राहणार आहेत. कार्यक्रमावर निवडणुकीचा परिणाम होऊ नये म्हणून निवडणूक कार्यक्रमात थोडासा बदल करण्यात आला आहे.

मतदारांची संख्या वाढल्याने मतदानाची वेळ सकाळी आठ ते सायंकाळी सात अशी करण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार मतमोजणी ३ मे रोजी होईल आणि ४ मे रोजी विशेष सभेतून नूतन पदाधिकाऱ्यांना पदभार दिला जाईल, अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा विद्यमान अध्यक्ष ॲड. सुरेश गायकवाड यांनी दिली. विशेष निवडणूक अधिकारी ॲड. व्ही. सी. दरगड, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अविनाश काळे, ॲड. अविनाश बिराजदार हे देखील निवडणुकीसाठी परिश्रम घेत आहेत.

निवडणुकीतील अंतिम उमेदवार

  • अध्यक्ष : ॲड. अमित आळंगे, ॲड. राजेंद्र फताटे व ॲड. एस. व्ही. उजळंबे

  • उपाध्यक्ष : ॲड. जयप्रकाश भंडारे, ॲड. परवेज ढालायत, ॲड. मल्लीनाथ मम्हाणे, ॲड. व्ही. पी. शिंदे

  • सचिव : ॲड. शामराव बिराजदार, ॲड. मनोज पामुल व ॲड. लक्ष्मण पाटील

  • सहसचिव : ॲड. मेघना मलपेद्दी, ॲड. मिरा प्रसाद, ॲड. निदा सैफन, ॲड. सुवर्णा शिंदे

  • खजिनदार : ॲड. प्रकाश अभंगे, ॲड. संतोषकुमार बाराचरे, ॲड. मयेप्पा गौडानवरू, ॲड. विनयकुमार कटारे, ॲड. अब्दुल शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.