Solapur Crime : सोलापूरत दोन घरफोड्यांप्रकरणी दोघांना अटक

सहा लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त
Gharphodi
Gharphodisakal
Updated on

सोलापूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या घरासह दोन घरफोड्यांप्रकरणी शहर गुन्हे शाखेने बीडच्या सराईत आंतरजिल्हा गुन्हेगारांसह दोघांना अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख ३७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मोहन दौलतराव मुंडे (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई, जि. बीड), सोहेल जलील शेख (वय २०, रा. करबला वेस, दमगानपुरा, अंबाजोगाई, बीड) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

संशयितांनी १७ डिसेंबर रोजी पोलिस निरीक्षक भोसले व सूरज पाटील यांची विजापूर रस्त्यावरील सैफुल परिसरातील पाटील नगरातील घरे फोडून अनुक्रमे सहा लाख ३५ हजार आणि ३२ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. घराला कुलूप लावून भोसले या मुंबईला तर पाटील हे पुण्याला गेले होते. याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल होता. सहा जानेवारी रोजी अंमलदार इम्रान जमादार यांना सराईत आंतरजिल्हा गुन्हेगारांसह दोघांनी हा गुन्हा केल्याची खबर मिळाली. तसेच ते पुन्हा शहरात घरफोड्या करण्यासाठी आले असून ते धर्मवीर संभाजी तलावानजीक पुतळ्याजवळ भिंतीला बसल्याचे समजले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मोरे, फौजदार अल्फाज शेख, अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, जमादार, राजकुमार पवार, बापू साठे, सुभाष मुंडे, सतीश काटे, बाळासाहेब काळे, सायबरकडील अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, वसीम शेख, इब्राहिम शेख यांनी ही कारवाई केली.

सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडचण

पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्हीचा शोध घेतला. मात्र, ते नव्हते. त्यामुळे अडचण निर्माण झाली. सहायक पोलिस निरीक्षक दादासाहेब मोरे व अंमलदार जमादार यांनी घटनास्थळासह परिसराची पाहणी केली. त्यातील काही तांत्रिक माहिती मिळवून त्याचे विश्लेषण केले होते. संशयित सोलापुरात आल्याचे कळल्यानंतर त्या माहिती आधारे त्यांच्याबाबत खात्री करण्यात आली.

जप्त केलेला मुद्देमाल

पोलिसांनी संशयितांकडून सहा लाखांचे १२ तोळे, पाच ग्रॅम सोन्याचे, १५० ग्रॅम चांदीचे दागिने, १५ हजारांची रोकड व चोरीसाठी वापरलेले लोखंडी कटावणी आदी साहित्य जप्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.