या दोन्ही महिलांच्या धाडसाचे कौतुक सर्वत्र होत आहे.
माढा (सोलापूर) : राहुलनगर येथील प्रीतम नंदकुमार शिंदे (वय 9) हा सीना नदीपात्राच्या (Seena River) कडेला खेळत असताना अचानक तोल जाऊन नदीत पडल्याने पाण्याबरोबर वाहत चालला होता. ही बाब या भागात काम करणाऱ्या दिनकर ओहोळ (वय 38) यांच्या लक्षात आल्याने ते प्रीतमला वाचवण्यासाठी नदीत उतरले असता, पाण्याच्या प्रवाहाचा वेग अधिक असल्याने तेही वाहून चालले. नदीच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या त्या दोघा जणांचे प्राण दोन धाडसी महिलांनी वाचवले आहेत. या दोन्ही महिलांच्या धाडसाचे कौतुक सर्वत्र होत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, की रविवारी (ता. 19) सकाळच्या सुमारास राहुलनगर येथील प्रीतम नंदकुमार शिंदे (वय 9) हा नदीपात्राच्या कडेला खेळत असताना अचानक तोल जाऊन नदीत पडल्याने पाण्याबरोबर वाहत चालला होता. ही बाब या भागात काम करणाऱ्या दिनकर ओहोळ (वय 38) यांच्या लक्षात आल्याने ते प्रीतमला वाचवण्यासाठी नदीत उतरले असता, पाण्याच्या प्रवाहाचा वेग अधिक असल्याने तेही वाहून चालले. त्यामुळे त्यांनी वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. या दोघांचा आरडाओरडा नदीच्या पात्रात पुढे असलेल्या राधिका राजेंद्र भोई व राणी धोंडीराम भोई या दोन महिलांनी ऐकला. या दोघींनी प्रसंगावधान राखत नदी पात्रात वाहून जाणाऱ्या प्रीतम शिंदे व दिनकर ओहोळ या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही महिलांना पोहता येत होते.
कंबरेपेक्षा अधिक व काही ठिकाणी गळ्याला पाणी लागत असतानाही या दोन्ही महिलांनी या दोघांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. स्वतःबरोबर आणलेली साडी या दोघांच्या दिशेने फेकून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रयत्न करूनही साडी या दोघांपर्यंत पोचत नव्हती. या दोघांचे पाण्याबरोबर वाहत जाणे सुरूच होते. या दोघी महिला या दोघांच्या दिशेने आडवे अधिक खोल पाण्यात जात जवळ पोचत साडी या दोघांच्या दिशेने फेकली. शेवटी ओहोळ यांच्या हातात साडी पोचली व दोन महिलांनी या दोघांना साडीच्या मदतीने ओढत पाण्याबाहेर काढले. स्वतःचा जीव धोक्यात घालून या दोघांना या दोन महिलांनी बाहेर काढले. या दोघी महिलांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे व धाडसाचे राहुलनगर भागातील लोकांनी कौतुक केले आहे.
गावचे सरपंच रोहनराजे धुमाळ यांनी या दोन्ही महिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दोघाजणांचे प्राण वाचवल्याने या दोन महिलांच्या धाडसाचे कौतुक करत या दोन महिलांचा योग्य सन्मान करणार असून शासनदरबारी त्यांना शौर्य पुरस्कार मिळावा म्हणून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.