Solapur Accident: तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन गावाकडं परतताना दोन भाविकांचा अपघातात जागीच मृत्यू; तिघेजण गंभीर जखमी

Solapur-Sangli Highway Accident : अपघातानंतर महामार्ग पोलिस पथक व सांगोला पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली.
Solapur-Sangli Highway Accident
Solapur-Sangli Highway Accidentesakal
Updated on
Summary

अपघाताचे वृत्त समजल्यानंतर नांदणी (ता. शिरोळ) गावावर शोककळा पसरली आहे. नांदणी व पेठवडगाव येथील मित्र देवीच्या दर्शनासाठी रविवारी रात्री दहाच्या सुमारास गेले होते.

सांगोला : तुळजाभवानी मातेचे (Tuljabhavani Mata) दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना भाविकांच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने मालट्रकला मागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील दोघा भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले.

अपघात सोमवारी (ता. ७) पहाटे चारच्या सुमारास सोलापूर-सांगली महामार्गावरील (Solapur-Sangli Highway) चिंचोली बायपासजवळ (ता. सांगोला) घडला. अपघातातील मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

सुखदेव कृष्णा बामणे (वय ४२) व नैनेश चंद्रकांत कोरे (३०, दोघेही रा. नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. तर अनिल शिवानंद कोरे (४२, रा. नांदणी), सुधीर सुभाष चौगुले (रा. पेठवडगाव), सूरज संजय विभूते (३८, रा. कोथळी, ता. शिरोळ) गंभीर जखमी झाले आहेत.

Solapur-Sangli Highway Accident
तासगावात खडाजंगी! खासदार विशाल पाटलांच्या अंगावर धावून गेले संजयकाका समर्थक; दोन्ही नेत्यांत जोरदार वादावादी

त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर महामार्ग पोलिस पथक व सांगोला पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त मोटार महामार्गावरून दूर करून जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व पेठवडगाव येथील पाच मित्र रविवारी (ता. ६) मोटारी (एमएच ०९- एफबी ३९०८) मधून नवरात्रीनिमित्त तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते.

दर्शनानंतर त्याच मोटारीमधून पाचजण सोलापूरकडून महामार्गाने नांदणी (जि. कोल्हापूर) कडे निघाले होते. सांगोल्याजवळील चिंचोली बायपासवर त्यांच्या भरधाव मोटारीने डाळिंब घेऊन जाणाऱ्या १६ चाकी मालट्रक (एमपी २०- झेडएम ९५१८) ला मागून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. जखमी सूरज विभूते यांनी मोटारचालक अनिल कोरे याच्याविरोधात सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Solapur-Sangli Highway Accident
'शेतकऱ्यांना गत हंगामातील 200 रुपये द्या, अन्यथा आमच्या हातात उसाचा बुडखा आहेच'; कारखानदारांना शेट्टींचा सज्जड दम

नांदणीवर शोककळा

जयसिंगपूर : अपघाताचे वृत्त समजल्यानंतर नांदणी (ता. शिरोळ) गावावर शोककळा पसरली आहे. नांदणी व पेठवडगाव येथील मित्र देवीच्या दर्शनासाठी रविवारी रात्री दहाच्या सुमारास गेले होते. ते सर्व मध्यरात्री तुळजापूर येथे पोहोचले. आज पहाटे दर्शन घेतले आणि ते सकाळी नांदणीकडे परत येत होते.

सुखदेव बामणे नांदणी रस्ता संभाजीपूर येथे तर नैनेश कोरे आडकेवाडी येथे राहात होते. कोरे उदगाव येथील ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत कामाला होते. त्यांच्या मागे आई, वडील, बहीण असा परिवार आहे. सुखदेव बामणे वर्कशॉपचे मार्केटिंग करीत होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Solapur-Sangli Highway Accident
शालेय गणवेशाची बिले काढण्यासाठी 80 हजारांची घेतली लाच; जिल्हा समन्वयक, सहनियंत्रक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.