मोहोळच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना विशेष खडतर सेवा पदक !

मोहोळच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना विशेष खडतर सेवा पदक !
मोहोळच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना विशेष खडतर सेवा पदक !
मोहोळच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना विशेष खडतर सेवा पदक !Canva
Updated on
Summary

पोलिस उपनिरीक्षक धनाजी खापरे व सुधीर खारगे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना विशेष खडतर सेवा पुरस्कार पदक प्रदान करण्यात आले.

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ पोलिस ठाण्यातील (Mohol Police Station) पोलिस उपनिरीक्षक धनाजी खापरे (Sub Inspector of Police Dhanaji Khapre) व पोलिस उपनिरीक्षक सुधीर खारगे (Sub Inspector of Police Sudhir Kharge) यांना राज्य शासनाच्या गृह विभागाकडून विशेष खडतर सेवा पुरस्कार पदक मिळाले. पोलिस उपनिरीक्षक धनाजी खापरे व सुधीर खारगे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना विशेष खडतर सेवा पुरस्कार पदक प्रदान करण्यात आले. त्यांचा तहसीलदार राजशेखर लिंबारे (Tehsildar Rajshekhar Limbare), पोलिस निरीक्षक अशोक सायकर (Police Inspector Ashok Saikar) यांच्या हस्ते मोहोळमध्ये विशेष सन्मान करण्यात आला.

मोहोळच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना विशेष खडतर सेवा पदक !
जिल्ह्यात मुलींचा वाढला जन्मदर! जाणून घ्या कोणत्या तालुक्‍यात किती मुली

पोलिस उपनिरीक्षक खापरे हे गडचिरोली जिल्ह्यात असताना त्या ठिकाणच्या रेगडी सशस्त्र पोलिस मदत केंद्रात ते सेवा बजावत होते. त्या ठिकाणचा सर्व परिसर हा आदिवासी असून त्या ठिकाणी नक्षलवाद्यांच्या कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू असतात. आदिवासी नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा पोलिस उपनिरीक्षक खापरे यांनी प्रयत्न केला. कम्युनिटी पोलिसिंग प्रोग्राम प्रभावीपणे राबवून आदिवासींना अनेक सोयीसुविधा मिळवून दिल्या. त्यात त्यांना वाहन चालविण्याचा परवाना, अंध व अपंगांना विविध सुविधा मिळवून दिल्या. नक्षलींनी शरण येण्यासाठी प्रयत्न केले, तसेच त्या ठिकाणी दोन वेळा नक्षलींनी बॉम्बस्फोट घडवून आणले होते तसेच त्या ठिकाणी भूसुरुंग पेरले होते ते शोधून काढले. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. पोलिस उपनिरीक्षक खापरे हे यापूर्वी पोलिस महासंचालक पदकाचेही मानकरी ठरले आहेत.

मोहोळच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना विशेष खडतर सेवा पदक !
'या' तालुक्‍यांतील कोरोना रुग्ण होईनात कमी! माढ्यात 15 रुग्ण गेले पळून

पोलिस उपनिरीक्षक सुधीर खारगे हे गडचिरोली जिल्ह्यातील गोडलभाई सशस्त्र पोलिस मदत केंद्रात कार्यरत होते. आदिवासी नागरिक नक्षलवाद्यांच्या कारवायांना बळी पडू नयेत म्हणून त्यांची विविध कार्यक्रमांद्वारे प्रबोधन करण्याचे काम केले. गोडलभाई पोलिस मदत केंद्र म्हणजे अत्यंत संवेदनशील आहे. त्या ठिकाणी पोलिस उपनिरीक्षक खारगे यांनी खडतर सेवा बजावली आहे. वर्षानुवर्षे आदिवासी समाज विविध अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकले होते, त्यांचे प्रबोधन करून त्यांना वस्तुस्थिती दाखवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.

या वेळी पोलिस निरीक्षक सायकर, तहसीलदार लिंबारे यांच्यासह गटविकास अधिकारी गणेश मोरे, नायब तहसीलदार लीना खरात, उपसभापती रत्नमाला पोतदार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.