Ujjani Dam :दमदार पावसानंतर किती भरले उजनी धरण? वाचा काय आहे लेटेस्ट अपडेट

Maharashtra Heavy Rain : सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले उजनी धरण पावसाळा सुरू होऊन २२ दिवस झाले
Ujjani Dam :दमदार पावसानंतर किती भरले उजनी धरण? वाचा काय आहे लेटेस्ट अपडेट
Ujjani Damsaka
Updated on

Solapur News: जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण आता उणे ३७ टक्क्यांवर आले आहे. धरणात सध्या आठ हजार क्युसेकने पाणी जमा होत आहे. भीमानगर येथे सोमवारी (ता. ८) दिवसभर ४१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक रात्री नऊ वाजेपर्यंत आठ हजार क्युसेकपर्यंत होती.

सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले उजनी धरण पावसाळा सुरू होऊन २२ दिवस झाले, तरीदेखील प्लसमध्ये आलेले नाही. अजूनही सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्यासाठी धरणावर दुबार पंपिंग सुरूच आहे. यंदाच्या उन्हाळ्यात धरण पहिल्यांदाच उणे ६० टक्क्यांवर पोचले होते.

Ujjani Dam :दमदार पावसानंतर किती भरले उजनी धरण? वाचा काय आहे लेटेस्ट अपडेट
Ujjani Dam : उजनीच्या पाण्यासाठी कुर्डुत जलाभिषेक; २३ नोव्हेंबरला कुर्डुवाडी - टेभुर्णी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा

७ जून रोजी धरण उणे ५९.९९ टक्क्यांवर (३१.५२ टीएमसी) होते. मागील महिनाभरात धरणात साडेबारा टीएमसी पाणी जमा झाले आहे. अजूनही धरण परिसरात दमदार पाऊस झालेला नाही. पुणे जिल्ह्यातील पावसाचे पाणी धरणात आल्याने आणि आता भीमानगर परिसरात चांगला पाऊस झाल्याने आता धरण उणे ३७ टक्क्यांपर्यंत आले आहे. धरणात आता विसर्ग वाढल्याने दोन दिवसात एक टीएमसी पाणी वाढणार आहे.

समांतरच्या अडथळ्यावर तीन कोटी खर्च

सोलापूर शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी सोलापूर ते उजनी अशी समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. सध्या ९३ किमी काम पूर्ण झाले आहे. पण, धरणातून रोडपर्यंत येताना ८०० मीटर अंतरासाठी खासगी जमीन लागणार आहे. त्याठिकाणच्या बाधित शेतकऱ्यांना एक कोटींचा मोबदला दिला जात आहे.

तर आता टेंभुर्णीजवळ देखील असाच अडथळा असून १८०० मीटरपर्यंतच्या खासगी जमिनीसाठी बाधित शेतकऱ्यांना दोन कोटींपर्यंत भरपाई द्यावी लागणार आहे. त्यानंतर दोन्ही ठिकाणच्या कामाचा मार्ग मोकळा होणार आहे. धरणातील पाणीसाठा वाढण्यापूर्वी तेथील जॅकवेलचे काम गतीने सुरू केले आहे. जेणेकरून मुदतीत पाइपलाइनचे काम पूर्ण होईल.

Ujjani Dam :दमदार पावसानंतर किती भरले उजनी धरण? वाचा काय आहे लेटेस्ट अपडेट
Ujjani Dam : ‘उजनी’वरील कालवा दुरुस्तीसाठी २२५ कोटी; डावा, उजवा कालव्यांची थांबणार गळती

महापालिकेचे दुबार पंपिंग बंद होणार

उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने सोलापूर महापालिकेला शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी तिबार पंपिंग करावे लागले होते. पण, धरणातील पाणीसाठा वाढल्याने महापालिकेने तिबार पंपिंग बंद केले. आता धरण उणे ३५ टक्क्यांवर आल्यास दुबार पंपिंग देखील बंद केले जाणार आहे. सध्या औज बंधारा हाऊसफुल भरलेला असून हिप्परगा तलावात देखील चांगला पाणीसाठा आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा ‘जैसे थे’ राहणार आहे.

Ujjani Dam :दमदार पावसानंतर किती भरले उजनी धरण? वाचा काय आहे लेटेस्ट अपडेट
Ujjani Dam : उजनीतून शेतीसाठी सलग ४० दिवस पाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.