सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उजनी धरणात सध्या २० टीएमसी गाळ आहे. त्याचे एक वर्षापूर्वी सर्वेक्षण होऊन अहवाल शासनाला सादर करण्यात आला, पण गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही. .१९८० नंतर सुरवातीच्या दोन वर्षांनंतर तब्बल ४२ वर्षे धरण दरवर्षी उन्हाळ्यात उणे पातळीत गेले. धरणाची क्षमता १२३ टीएमसी आहे, पण गाळामुळे २० टीएमसी पाणी वापरता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे.सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार असलेले उजनी धरण दरवर्षी उन्हाळ्यात तळ गाठते. त्यामुळे ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ याची प्रचिती जिल्ह्यातील सर्वांना येते. गाळ काढल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल व शेतकऱ्यांनाही वेळेवर पाणी मिळेल. त्यातून जिल्ह्याला दुष्काळाची तीव्रता जाणवणार नाही. दरम्यान सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, धाराशिव या जिल्ह्यांतील ४७ योजना उजनी धरणावरच अवलंबून आहेत. दुसरीकडे, जिल्ह्यातील एक लाख ६९ हजार हेक्टरला धरणातून थेट पाणी मिळते. त्यामुळे रब्बीच्या जिल्ह्यात खरीप पिकांखालील क्षेत्र वाढले आहे..Ujani Dam Water : उजनीतून महिनाभरात तब्बल एवढ्या टीएमसी पाण्याचा झाला विसर्ग; जाणून घ्या....सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून सोलापूरची देशभरात नवी ओळख निर्माण झाली. सोलापूर जिल्ह्यात सध्या ४२ साखर कारखाने आहेत. कर्जत जामखेड, धाराशिव, इंदापूरसह सोलापूर शहर व जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतींच्या योजना उजनी धरणावरूनच आहेत. गतवर्षी धरण उणे ६० टक्के गेले आणि शेतकऱ्यांना गरज असतानाही एक आवर्तन सोडता आले नाही. दुसरीकडे, शहरांनाही पाणीपुरवठा व्यवस्थित होऊ शकला नाही, त्यांना दुबार, तिबार पंपिंगवर कोट्यवधींचा खर्च करावा लागला. अशी स्थिती प्रत्येक दोन-तीन वर्षांतून एकदा निर्माण होत असतानाही शासनाकडून धरणातील गाळ काढण्याची कार्यवाही झालेली नाही, हे विशेष.उजनी धरणावर पर्यटन; सोमवारपासून सर्व्हेउजनी धरणावरील पर्यटनाचा २८२.७५ कोटी रुपयांचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला. त्याला शासनाच्या उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे. त्यातील १९०.१९ कोटी रुपये उजनी धरणावरील जलपर्यटनासाठी आहेत.या प्रकल्पांतर्गत उजनी धरण परिसरात मनोरंजन केंद्र, हॉटेल्स, सभागृह, बोर्ड रूम, रॉक पूल, लाइट हाऊस, बोट सफारी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून धरणाची खोली, दरवर्षीची पाणीपातळी, जलसफारी कोठे करता येऊ शकते या बाबींचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यासाठी दोन पथके धरणावर आली असून, बोटीतून त्यांचा सर्व्हे सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यातून पर्यटनाला वाव मिळणार असून, मोठा महसूलही मिळणार आहे. पण, आता सर्व्हेनंतर कामाला लवकर सुरवात व्हावी, हीच सर्वांची अपेक्षा आहे..‘कृष्णा-मराठवाडा’ स्थिरीकरणानंतरकृष्णा-मराठवाडा स्थिरीकरणानंतर नीरा नदीतील पाणी उजनी धरणात आणले जाणार आहे. जेवढे पाणी नीरा नदीतून उजनी धरणात जमा होईल, तेवढेच पाणी मराठवाड्याला दिले जाणार आहे. या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, पण यामुळे उजनीतील सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावर अतिक्रमण होऊ नये, एवढी माफक अपेक्षा सोलापूरकरांची आहे.धरणातील गाळाचा एक वर्षापूर्वी सर्व्हे झाला आहे. त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून, आगामी काळात गाळ काढण्याची कार्यवाही होईल. धरणात अंदाजे १८ ते २० टीएमसीपर्यंत गाळ आहे.- आर. पी. मोरे, कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन, सोलापूर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.