Ujani Dam: उजनी धरण सोमवारी 100 टक्के भरणार! 10 दिवसांत धरण ओव्हरफ्लो; भीमा नदीत सोडले जाणार पाणी

maharashtra Rain Update: धरण पूर्ण भरल्यावर पुढील अंदाज घेऊन भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे.
rise in water level of Ujani dam
rise in water level of Ujani dam Sakal
Updated on

Solpaur Latest Update: 22 जानेवारी 2024 रोजी उणे झालेले उजनी धरण 25 जुलैपर्यंत उणे पातळीतच होते. पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता 80 टक्के भरले आहे. धरणातील एकूण पाणीसाठा आता 107 टीएमसी इतका झाला आहे. धरणात सध्या दौंडवरुन 65 हजार क्युसेकने पाण्याची आवक येत आहे. त्यामुळे उजनी धरण सोमवारी 100 टक्के (117 टीएमसी) भरेल, असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. धरण पूर्ण भरल्यावर पुढील अंदाज घेऊन भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे.

उजनी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा 42 टीएमसीपर्यंत (79 टक्क्यांपर्यंत) पोचला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसून उजनी धरण परिसरात देखील कमीच पाऊस झाला आहे. पण, पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता 100 टक्क्याकडे वाटचाल करीत असल्याची सद्य:स्थिती आहे.

rise in water level of Ujani dam
Ujani Dam Water Storage : उजणी मायनसमधून प्लसमध्ये; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

उजनी धरणावर पुणे, नगर, धाराशिव व सोलापूर अशा चार जिल्ह्यांच्या 42 पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. धरणाचा आधार असल्याने सोलापूर जिल्ह्यात केळी, डाळींब, ऊस अशा पिकांची वाढ झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एक लाख 62 हजार हेक्टर जमिनीला उजनीतून थेट पाणी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात उजनी धरणाचा फार मोठा वाटा आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी पाण्याचे ठोस नियोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

गतवर्षी ६६ टक्केच भरले अन्‌ उन्हाळ्यात उणे ६० टक्के झाले, आता...

गतवर्षी सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला होता. पुणे जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे उजनी धरण ६६ टक्केच भरले होते. उन्हाळ्यात उजनी धरणातील पाणीसाठा धरण झाल्यापासून पहिल्यांदाच उणे ६० टक्क्यांपर्यंत पोचला होता. पाऊस लांबला असता तर जिल्ह्यातील पाणीटंचाई तीव्र झाली असती, अशी परिस्थिती होती. पण, यंदा उजनी पावसाळा दोन महिने शिल्लक असतानाही 80 टक्क्यांपर्यंत भरत असल्याची स्थिती आहे.

अडीच कोटी युनिट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट

पावसाळ्यात चांगला पाऊस होईल आणि उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्यावर खाली भीमा नदीतून पाणी सोडून दिले जाते. त्यावेळी धरणावरील वीजनिर्मिती प्रकल्पातून वीजेची निर्मिती केली जाते. गतवर्षी धरण ६६ टक्केच भरल्याने वीजनिर्मिती होवू शकली नाही. यंदा अडीच लाख युनिट (अडीच मिलियन युनिट) वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. पुणे जिल्ह्यातून दौंड, बंडगार्डनवरून येणारा विसर्ग, शिल्लक पावसाचे दिवस (हवामान खात्याच अंदाज) व धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याच अंदाज घेवून धरणातून नदीतून पाणी सोडले जाणार आहे. त्यावेळी वीजनिर्मितीची प्रक्रिया सुरू होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील आठवड्यात वीजनिर्मिती सुरू होईल अशी सद्यःस्थिती आहे.

rise in water level of Ujani dam
Ujani Dam : उजनी धरणात ५० टीएमसी पाणीसाठा;प्लसमध्ये येण्यासाठी २५ पावले दूर,धरणात ६८०० क्युसेकची आवक

ठळक बाबी...

- उजनी धरणावर सोलापूर शहर, धाराशिव, कर्जत-जामखेडसह अनेक एमआयडीसींना, साखर कारखान्यांना व गावांना उजनीचाच आधार आहे.

- जिल्ह्यातील दीड ते पावणेदोन लाख हेक्टरला थेट उजनी धरणातून पाणीपुरवठा होतो.

- जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले असून त्यातून सर्वाधिक ४० हून अधिक साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात सुरू झाले आहेत.

- उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही उपसा सिंचन योजना पूर्ण होणार असल्याने धरणातील पाणी त्या जमिनींना देखील मिळणार आहे.

- अवघ्या 9 दिवसांत उजनी धरणात आले 45 टीएमसी पाणी

- 25 जुलैपर्यंत उणे पातळीत असलेले उजनी धरण अवघ्या 10 दिवसातच 100 टक्के भरले

- सोलापूर जिल्हा, उजनी धरण परिसरात समाधानकारक पाऊस नाही, तरी पुण्यातील धरणातून सोडलेल्या विसर्ग ठरला फायद्याचा

- पुढील आठवड्यात उजनी धरणातील वीजनिर्मिती प्रकल्प सुरू होण्याची शक्यता; उजनी सोमवारी 100 टक्के भरणार

rise in water level of Ujani dam
Ujani Dam : उजनी जलाशयात बोट बुडून 6 जणांचा मृत्यू; दुर्घटनेनंतर प्रशासन उपायोजनासाठी काय भूमिका घेणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.