Maharashtra Drought News : जिल्ह्यात दुष्काळ, शेतकरी अडचणीत; भाजप नेत्यानेच केली 'ही' मागणी !

..तरी किमान शेतात उभी असलेली पिके तरी हाती लागतील.
devendra-fadanvis
devendra-fadanvisSaklal
Updated on

Maharashtra Drought News : सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने आवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतात उभी असलेली पिके जळून जात आहेत.

किमान ती पिके तरी हाती लागावीत यासाठी उजनी धरणातून पाणी कालवा व बोगद्यातून सीना नदीत सोडावे अशी मागणी मोहोळचे भाजपचे नेते संजय क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी सायंकाळी मंत्रालयात समक्ष भेटून केली आहे. तशा आशयाचे लेखी निवेदन त्यांनी दिले आहे.

devendra-fadanvis
Mumbai-Goa Highway : टोलनाका तोडफोड प्रकरण भोवलं; मनसेच्या 14 पदाधिकाऱ्यांना अटक

पावसाळा निम्मा संपला आहे. जिल्ह्यासह मोहोळ तालुक्यात एक ही दमदार पाऊस पडला नाही. शेतकऱ्यांच्या शेतात ऊस, मका अशी पिके उभा आहेत. तसेच द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ या फळबागाही आहेत. विहिरी व बोअरच्या पाण्याची पाणी पातळी घटली आहे.

devendra-fadanvis
Rahul Gandhi Latest News : देशात प्रत्येक संघटनेत RSS चे लोक, मंत्रालयातही हस्तक्षेप; राहुल गांधींचा गंभीर आरोप

त्यामुळे जनावरांच्या पिण्याचा, शेतीच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. 70 टक्के उजनी भरल्या शिवाय शेतीला पाणी न देण्याचे जलसंपदा विभागाचे धोरण आहे. असे जरी असले तरी उजनीच्या वरची माणिकडोह, डिंभे, भामा आसखेड, पवना, वडिवळे, पानशेत, वरसगाव, खडकवासला यासह अन्य धरणात 50 टक्के च्या पुढे पाणीसाठा झाला आहे.

devendra-fadanvis
Devendra Fadanvis : मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक ; आमदारांनी दिली माहिती

त्या धरणातील दहा टक्के पाणी उजनी सोडावे ते पाणी कालवा व बोगद्याद्वारे सोडले तरी किमान शेतात उभी असलेली पिके तरी हाती लागतील, तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.