राष्ट्रवादीचं टेन्शन वाढवणारी बातमी; माढ्यातून परिचारक उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? राजकीय घडामोडींना वेग

Madha Assembly Constituency Pandharpur : माढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावांचा समावेश आहे. या 42 गावांमध्ये परिचारक गटाची मोठी राजकीय ताकद आहे.
Madha Assembly Constituency Pandharpur
Madha Assembly Constituency Pandharpuresakal
Updated on
Summary

परिचारक यांनी थेट विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेतली, तर आमदार शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

पंढरपूर : माढा विधानसभा मतदारसंघात (Madha Assembly Constituency) नवा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. माढा मतदारसंघात उमेश परिचारक (Umesh Paricharak) यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे (Baban Shinde) यांचे राजकीय टेन्शन वाढले आहे. परिचारक यांनी थेट विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेतली, तर आमदार शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

माढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावांचा समावेश आहे. या 42 गावांमध्ये परिचारक गटाची मोठी राजकीय ताकद आहे. शिवाय, याच मतदारसंघात माळशिरस तालुक्यातील 14 गावांचा समावेश आहे. यामध्ये त्यांच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा ही समावेश आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातून परिचारकांना निवडणूक लढवणे हे सोपे असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. निवडणुकी संदर्भात अलीकडेच परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली.

Madha Assembly Constituency Pandharpur
हाळवणकरांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आमदार आवाडे BJP मध्ये करणार प्रवेश? सुपुत्राला मिळणार विधानसभेचं तिकीट?

या बैठकीत युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे. या बैठकीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी उमेश परिचारक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा प्रस्ताव ठेवला आहे. दोन दिवसांत या प्रस्तावावर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन परिचारक यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहे.

Madha Assembly Constituency Pandharpur
तुम्हाला कानडी येतं का? नसेल तर शिकून घ्या...; शिक्षण खात्याचा अजब निर्णय, शिक्षकांना दिले उद्दिष्ट

त्यामुळे आता परिचारक गटाचे कार्यकर्ते माढ्याच्या तयारीला लागले आहेत. मंगळवारी (ता .24) या संदर्भामध्ये बाजार समितीचे माजी सभापती दिलीप आप्पा घाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये माढा विधानसभा मतदारसंघातून उमेश परिचारक यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी त्यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पांडुरंग साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कैलाश खुळे, बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड,पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख, लक्ष्मण धनवडे, दिलीप चव्हाण, बाळासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.

Madha Assembly Constituency Pandharpur
राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा 60 फूट उंच तलवारधारी पुतळा उभारण्यात येणार; आयुर्मान असणार 100 वर्षे

पांडुरंग परिवाराची राजकीय ताकद मोठी

बाजार समितीचे माजी सभापती दिलीप घाडगे म्हणाले, पंढरपूर तालुक्यातील 42 गावे माढा विधानसभा मतदारसंघात असून यामध्ये एक लाख 5 हजार मतदार आहेत. पांडुरंग परिवाराने या 42 गावांमध्ये चांगले काम केले आहे. तीन जिल्हा परिषद सदस्य व सहा पंचायत समिती सदस्य आहेत. तसेच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने या भागातील सुमारे पाच लाख टन उसाचे गाळप करून सभासदांना चांगला ऊस दर दिला आहे. 80 टक्के ग्रामपंचायतीवर पांडुरंग परिवाराची सत्ता आहे. माळशिरस तालुक्यातील 15 पंधरा गावांमध्येही पांडुरंग परिवार सक्रिय आहे. या भागातील सुमारे दीड लाख टन ऊस गाळप केले आहे. या भागात पांडुरंग परिवाराची राजकीय ताकद मोठी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.