Solapur Kesar Mango : सरस चवीचा सोलापुरी केशर

सुपीक जमिनीतील मूलद्रव्ये व सेंद्रिय लागवडीने वेगळी ओळख
 Solapur Kesar Mango
Solapur Kesar Mango sakal
Updated on

सोलापूर : आंब्याच्या बाजारात स्थानिक केशरने जोरदार धडक मारली असून चव व गुणवत्तेच्या बाबतीत सोलापुरी केशरची नवी ओळख निर्माण होऊ लागली आहे. जमिनीचा पोत व सेंद्रिय लागवडीने सोलापुरी केशर बाजारात इतर भागातील केशरच्या तुलनेत अधिक मागणी खेचू लागला आहे. आता त्याची ब्रॅंडींग व सेंद्रिय बाजार या दोन्ही गरजा भागविण्याची गरज आहे.

सध्या सोलापूर व इतर बाजारपेठांमध्ये केशरची आवक सुरू झाली आहे. स्थानिक केशरने बाजारात जोरदार धडक मारली आहे. स्थानिक भागातील केशरची चव देखील बाहेरून येणाऱ्या केशरची चवीपेक्षा अधिक चांगली आहे.

चांगल्या चवीमुळे सोलापुरी केशर आता बाजारात चांगलाच भाव खाऊ लागला आहे. पंढरपूरसह परिसरातील गावामधून केशर आंबा येऊ लागला आहे. व्यापाऱ्यांनी स्थानिक केशर आंब्याची चव अधिक चांगली असल्याचे मान्य करून तसा त्याला योग्य भाव देण्याची भूमिका घेतली आहे.

जवळपास बहुतांश केशर हा सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेला असल्याने चव व गुणवत्तेत तो भारी पडला असल्याचे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे. या उलट बाहेरगावावरून येणारा केशर हा काही वर्षापूर्वीच्या लागवडीचा आहे.

त्याची चव सोलापूरच्या केशरच्या तुलनेत कमी पडते. पूर्वीच्या लागवडीत सेंद्रिय पध्दत वापरली असेलच असे सांगता येत नाही. मात्र सोलापूर भागात जवळपास झालेल्या सर्वच लागवडी या सेंद्रिय पद्धतीने झालेल्या आहेत. त्यामुळे त्या पहिल्यापासूनच गुणवत्तेच्या बाबतीत अधिक चांगल्या ठरत आहेत.

अद्याप बाजारात सेंद्रिय उत्पादनांची वेगळी नोंद किंवा विक्रीव्यवस्था नसल्याने उत्पादकांसमोर अडचणी आहेत. त्यामुळे चव चांगली असल्याने इतर बाजाराच्या तुलनेप्रमाणे थोडा अधिक चांगला दर मिळतो एवढेच होत आहे. पण सोलापुरी केसरची ही नवी ओळख होत असताना त्याचे ब्रॅंडीग व सेंद्रिय बाजारपेठेचा अभाव हा एक अडथळा झाला आहे. हे अडथळे दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

सोलापुरी केशरची वैशिष्ट्ये…

  • सोलापुरी केशरची चव बाहेरुन येणाऱ्या केशरपेक्षा अधिक चांगली

  • पंढरपूरसह परिसरातील गावामधून येऊ लागला केशर आंबा

  • सेंद्रिय पध्दतीने लागवड केल्याने चव व गुणवत्तेत भारी

  • सोलापुरी केशर नवीन तर बाहेरगावावरून येणारा केशरची जुना

  • सेंद्रिय केशर आंब्यांची वेगळी नोंद अन्‌ विक्रीव्यवस्था व्हावी

मुळातच सोलापूरच्या भागात झालेली केशर लागवड ही बहुतांश सेंद्रियच आहे. आपला भाग हा अवर्षणप्रवण आहे. जमिनीत पोटॅश व गंधकाचे प्रमाण भरपूर असल्याने केसरसाठी ते उपयुक्त ठरले आहे. जमिनीतील सुक्ष्म मूलद्रव्याचे प्रमाण देखील कारणीभूत ठरते. त्यामुळे केसरची चव अधिक चांगली आहे. या सर्व कारणामुळे सोलापुरी केशर ही नवी ओळख बाजारात होऊ लागली आहे.

- डॉ. लालासाहेब तांबडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर

बाजारात बीड, औरंगाबाद भागातून येणाऱ्या केशर आंब्याच्या तुलनेत स्थानिक सोलापूर केशरची चव व गुणवत्ता खूपच चांगली आहे. गुणवत्तेतील हा फरक स्पष्टपणे जाणवू लागला आहे. त्यामुळे बाजारात त्याला देखील चांगली मागणी आहे.

- फैय्याज बागवान, अध्यक्ष, फ्रुट मर्चंट असोसिएशन, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.