विद्यापीठाची २५ मेपासून परीक्षा ऑफलाईनच! १५ मिनिटांचा ज्यादा वेळ

आगामी सत्र परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने घेतला. पण, ही परीक्षादेखील ऑनलाईनच घ्यावी, अशी मागणी होत आहे. २५ मेपासून परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले असून ही परीक्षा ऑफलाईनच होईल, अशी ठाम भूमिका विद्यापीठाने घेतली आहे. कुलगुरुंच्या बैठकीनंतर वेळापत्रक अंतिम होणार आहे.
student
studentsakal
Updated on

सोलापूर : कोरोनामुळे विद्यापीठांच्या तीन सत्र परीक्षा ऑनलाइन पार पडल्या. आता कोरोना कमी झाल्याने आगामी सत्र परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने घेतला. पण, ही परीक्षादेखील ऑनलाईनच घ्यावी, अशी मागणी होत आहे. २५ मेपासून परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले असून ही परीक्षा ऑफलाईनच होईल, अशी ठाम भूमिका विद्यापीठाने घेतली आहे. कुलगुरुंच्या बैठकीनंतर वेळापत्रक अंतिम होणार आहे.

student
राज्यातील कोरोना नियंत्रणात। २७ जिल्ह्यांतून हद्दपार होतोय कोरोना

कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये रुग्णवाढ व मृत्यूदर खूप होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय राज्य स्तरावरून झाला. कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईनच घेतल्या. विशेष बाब म्हणजे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आणि बहुतेक विद्यापीठांचा निकाल १०० टक्के लागला. पण, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. या परीक्षा किती पारदर्शक झाल्या, किती मुलांना प्रश्नपत्रिकांमधील उत्तरे प्रामाणिकपणे सोडविली, असेही प्रश्न उपस्थित झाले. पण, विद्यापीठातील अधिकाऱ्यांना ठामपणे त्याचे उत्तर देता आले नाही. नोकरीच्या बाबतीतही कोरोना काळात परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्यांना अडचणींचा सामना करावा लागला. आता विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ऑफलाईनच परीक्षा घेण्यावर विद्यापीठ प्रशासन ठाम आहे. काही विद्यार्थी संघटनांनी परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी केली. तर काहींनी परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्याची विनंती केली आहे. त्यासंदर्भात विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस या बैठक घेणार आहेत. दरम्यान, परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाविद्यालयांच्या स्तरावर होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पंधरा मिनिटांचा वाढीव वेळ मिळणार आहे.

student
वेतनावर राज्याचा दरवर्षी १.२३ लाख कोटींचा खर्च! शिक्षकांचा पगार ५२ हजार कोटींचा

ऑनलाईन परीक्षा नकोच...
१) फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारी परीक्षा मे महिन्यात होणार असल्याने अभ्यासाला पुरेसा वेळ
२) ऑनलाईन परीक्षेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता व परीक्षेच्या पादर्शकतेवर तज्ज्ञांचे प्रश्नचिन्ह
३) शहर-ग्रामीणमधील कोरोनाचे रुग्ण घटल्याने आता ऑनलाइन परीक्षेची गरज नाही
४) विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि नोकरीतील संधीसाठी ऑफलाईन परीक्षा गरजेची

student
भोंग्यांसाठी परवानगीचे बंधन! ‘अशी’ असणार भोंग्यांची वेळ अन्‌ आवाजाची मर्यादा

विद्यापीठाची सद्यस्थिती...
सलंग्न महाविद्यालये
१०९
अंदाजित विद्यार्थी
६५,०००
एकूण अभ्यासक्रम
३७५
नियोजित परीक्षा
२५ मेपासून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()