Solapur Rain News : पहिल्याच पावसात झाडे पडल्याने नुकसान

Rain in Solapur : मंगळवेढ्यात अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळित; किल्ल्याचा बुरूजही ढासळला
सायंकाळी वादळासह अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीने मोठे नुकसान झाले आहे
सायंकाळी वादळासह अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीने मोठे नुकसान झाले आहे esakal
Updated on

Solapur Monsoon Update : शहरात सायंकाळी वादळासह अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीने प्रमुख चौकातील रस्त्यावर झाडे कोसळून वाहतूक विस्कळित तर वादळ व पावसाने छोट्या व्यावसायिकांचे देखील नुकसान झाले. प्रांत कार्यालय व नगरपालिका या कार्यालयासमोर पावसाचे पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागला.

या परिसरात तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, नगरपालिका व उपविभागीय कार्यालय असून, याठिकाणी शहरातील नागरिकांची सतत येत असते. परंतु शासकीय कार्यालय बंद होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर परत जाणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागला. वादळी पावसाने जुन्या ऐतिहासिक किल्ल्याच्या बुरुजाचे दगड रस्त्यावर पडले, चोखामेळा चौकात भर रस्त्यावर झाड कोसळून वाहतूक विस्कळित झाली.

सायंकाळी वादळासह अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीने मोठे नुकसान झाले आहे
Solapur Rain : कुठे रिमझिम, कुठे मध्यम तर कुठे मुसळधार; ताली व बागांमध्ये साचले पाणी

रतनचंद शहा बँकेसमोर लावलेल्या दुचाकीवर झाड कोसळले. सांगोला नाका येथील एका पान टपरी व्यावसायिकाची पान टपरी उलटल्याने झाल्याने आतील मालाचे पावसात नुकसान झाले. शनिवार पेठ, गोविंद बुवा मंदिर, सनगर गल्ली या ठिकाणी झाडे कोसळली. नगरपालिका परिसरात असलेल्या गटारीत पावसाचे पाणी तुंबल्यामुळे गटारीत असलेले दूषित पाणी व घाण देखील या रस्त्यावर आली साचलेल्या पाण्यातून दुचाकीस्वारांना व सायकलस्वारांना आपली वाट शोधावी लागली. याच परिसरात लहान मुलांसाठी असलेल्या गणेश बागेचा परिसर असल्यामुळे तुंबलेल्या पाण्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला.

सायंकाळी वादळासह अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीने मोठे नुकसान झाले आहे
Solapur News : हद्दवाढ भागातील कर्मचाऱ्यांना ‘सर्वोच्च’ दणका; कायम करण्यासह आर्थिक फायदे देण्याबाबतचा २०१३ चा आदेश रद्द

पावसाळ्याच्या तोंडावर पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचल्याने प्रशासनाने पावसाळ्यातील पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी केलेले नियोजन समोर आले. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी नगरपालिकेने पावसात रस्त्यावर साठणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होऊ लागली. दरम्यान वादळी पावसाने नुकसान झालेल्या छोट्या व्यवसायिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com