मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविणाऱ्या 230 कोटी रुपयांच्या "आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक तीन"या योजनेचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागाचे पुणे येथील अधिक्षक अभियंता धुमाळ यांना दिल्या असल्याची माहिती माजी आमदार राजन पाटील यांनी दिली.
या संदर्भात माहिती देताना माजी आमदार पाटील म्हणाले, मोहोळ तालुक्यातील अनगर व परिसरातील गावांना कायम पाण्याचा दुष्काळ आहे. वेळ प्रसंगी येथील शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरीकांना पावसाळ्यात ही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते.
शेतीचा विषय तर लांबच. या गावांना जवळून कुठूनही जलवाहिन्या टाकून पाणी आणण्याची सुविधा नाही.यावर पर्याय म्हणुन माजी आमदार पाटील यांनी अनगर व 9 गावे उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव तयार केला.तो शासन दरबारी दाखल ही केला. त्या योजनेचा सर्वे करण्याचा आदेश शासनाने दिला होता, त्या प्रमाणे एका संस्थेने सर्वे ही केला. हा प्रस्ताव सध्या "एसएलटीसी" या मुख्य विभागाकडे आहे.
दरम्यान "अनगर व 9 गावे उपसा सिंचन योजने" चे नामकरण करून शासनाने ते "आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक तीन" असे केले आहे. दरम्यान या योजनेमुळे अनगर परिसरातील दहा गावातील 18 हजार एकर क्षेत्र ओलिता खाली येणार आहे.
हे पाणी आष्टी तलावातून उचलले जाणार आहे. जलवाहिन्या टाकून ते पाणी देवडीच्या उंच माळरानावर आणले जाणार असून, त्या ठिकाणी मुख्य चेंबर असणार आहे.नंतर तेथून प्रत्येक गावाच्या क्षेत्रानुसार वॉल्वव्दारे पाण्याचे वितरण केले जाणार आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचार संहिता सुरू होण्या अगोदर सुधारित प्रस्ताव मान्यता मिळविण्याचा आमचा मानस असल्याचे माजी आमदार पाटील यांनी सांगितले. या योजनेचे काम सुरू झाल्या पासून दोन वर्षात ही योजना कार्यान्वित होणार आहे.
योजना कार्यान्वित झाल्यानंतर तालुक्यात द्राक्ष, डाळिंब, पेरू, केळी या फळबागा सह उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढीस लागणार आहे. ही योजना लवकर मार्गी लागण्यासाठी संबंधित विभागाला सूचना देऊन प्रयत्न केल्या बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार पाटील यांच्यासह आमदार यशवंत माने, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे उपस्थित होते.
देवडी, वाफळे, खंडोबाचीवाडी, नालबंद वाडी, कोंबडवाडी, कुरणवाडी, हिवरे, वडाचीवाडी, अनगर
भूसंपादन 10 हेक्टर- 15 कोटी, उर्ध्वगामी नलिका पंपग्रह- 25 कोटी, वितरण कुंड पोहोच कालवा-10 कोटी, बंदिस्त नलिकेद्वारे वितरण व्यवस्था- 60 कोटी, यांत्रिकी व विद्युत घटक- 25 कोटी, आष्टी कालवा अस्तरीकरण- 70 कोटी अनुषंगिक कामे-30 कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.