सोलापूर : शहरातील लसीकरण केंद्रे पुन्हा हाऊसफुल्ल

ओमिक्रॉनची भीती; प्रशासनाचीही कडक कारवाई
 Vaccination
VaccinationSakal
Updated on

सोलापूर : शहरात पेट्रोलपंप, मॉल, बाजारपेठ, बॅंका आदीठिकाणी दोन डोसशिवाय प्रवेश नाही. तसेच महापालिकेकडून सुरू असलेल्या कडक कारवाईमुळे बॅंक, पेट्रोलपंपावरील रांगा आता लसीकरण केंद्रावर(vaccination center)दिसू लागल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून महापालिका आरोग्य केंद्र व प्रभागातील नगरसेवकांची बंद असलेली केंद्रे आता पुन्हा ॲक्‍टिव्ह झाल्याचे पहायला मिळत आहे. मागील पंधरा दिवसात तब्बल ८० हजार लोकांनी लस घेतली आहे.

ओमिक्रॉनच्या(omicron)पार्श्‍वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार शहरात महापालिका, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस प्रशासन यांची संयुक्‍त कारवाई सुरू आहे. दोन डोसशिवाय पेट्रोल नाही, बॅंकेत जाता येणार नाही, मॉलमध्ये जाण्यावर बंदी, बाजारपेठांमध्ये फिरण्यावर बंदी घालत नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर अनेक प्रकारची बंधने घालण्याची कारवाई होत आहे. तसेच लस तपासणी मोहिमेत नागरिकांवर १० हजार रुपयापर्यंत दंड आकारण्यात येत आहे.

 Vaccination
जीएसटीची सर्वाधिक थकबाकी महाराष्ट्राची

प्रशासनाकडून कारवाईची कडक अंमलबजावणी होत असल्याने बाजारपेठ, बॅंका, पेट्रोलपंपावरील रांगा आता लसीकरण केंद्रावर पाहायला मिळत आहे. महापालिका आरोग्य विभाग लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी गेल्या चार महिन्यापासून मोबाइल क्‍लिनिक, युवा स्वास्थ अभियान आणि आता ‘हर घर दस्तक’ असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र देशात ओमिक्रॉनचे तीन रुग्ण आढळल्याने नागरिकांच्या मनात व्हायरसची भीती निर्माण झाली. त्यामुळे महापालिकेच्या लसीकरण केंद्राकडे लोकांची पावले वळू लागली होती. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी दोन डोसशिवाय प्रवेश नाकारल्याने विनालस फिरणाऱ्या नागरिकांना दैनंदिन व्यवहारात अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्यामुळे मागील आठवड्यापासून महापालिकेची नागरी आरोग्य केंद्रे लसीकरणासाठी हाऊसफुल्ल झाली आहेत. त्याचबरोबर प्रभागात नगरसेवकांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या लसीकरण केंद्रांवरही आता गर्दी होत आहे.

नागरिकांचा प्रतिसाद

आज शहरात लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांची संख्या ७ लाख ३४ हजार इतकी आहे. त्यात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५ लाख ९६१ इतकी आहे. तर दुसरा डोस घेऊन सुरक्षित झालेल्यांची संख्या २ लाख ७० हजार १९७ इतकी होती. लसीचा एकही डोस न घेतलेल्या नागरिकांची संख्या ही १ डिसेंबरपर्यंत २ लाख ३३ हजार इतकी होती. आजमितीला ही संख्या दीड लाखावर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.