Solapur Crime : व्याजाचे पैसे वसूल करण्यासाठी सुपारी देऊन भरदिवसा भाजीविक्रेत्यावर केला गोळीबार व कोयत्याने हल्ला

व्याजाचे पैसे व मुद्दल असे एकूण बारा लाख रूपये देत नाही म्हणून सुपारी देऊन पाच जणांच्या टोळीकडून जीवे मारण्याच्या उद्देशाने टेंभुर्णीतील भाजीपाला विक्रेत्यावर पिस्तूलने गोळीबार करून खूनी हल्ला केला.
vegetable seller attacked with koyta and gun case registered against six people solapur crime
vegetable seller attacked with koyta and gun case registered against six people solapur crimeSakal
Updated on

टेंभुर्णी : व्याजाचे पैसे व मुद्दल असे एकूण बारा लाख रूपये देत नाही म्हणून सुपारी देऊन पाच जणांच्या टोळीकडून जीवे मारण्याच्या उद्देशाने टेंभुर्णीतील भाजीपाला विक्रेत्यावर पिस्तूलने गोळीबार करून खूनी हल्ला केला.

या हल्ल्यात राहुल महादेव पवार ( वय 35 रा.महादेवगल्ली टेंभुर्णी) याच्या उजव्या मांडीत गोळी लागून तसेच डोक्यात कोयत्याने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला असून टेंभुर्णीतील खाजगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. टेंभुर्णीतील जगदंबा व्हेजिटेबल ॲन्ड फ्रुट या भाजीपाला विक्रीच्या दुकानात रविवार ( ता.24) रोजी सायंकाळी साडेपाच वाचण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी राहूल पवार यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून धीरज रमेश थोरात व इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री संशयित आरोपी धीरज थोरात ( वय-23 रा. टेंभुर्णी) यास पोलीसांनी ताब्यात घेऊन अटक केली असून माढा न्यायालयात हजर केले असता त्यास शनिवार ( ता.30) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीसांकडून याविषयी समजलेली अधिक माहिती अशी, राहूल पवार यांचे जगदंबा व्हेजिटेबल ॲन्ड फ्रुट या नावाचे भाजीपाला विक्रीचे दुकान आहे. सन 2016 मध्ये संशयित आरोपी याचे वडील धीरज थोरात याचे वडील रमेश थोरात यांची भिशी चालवित असल्याने राहूल पवार यांची ओळख झाली.

रमेश थोरात यांचेकडून राहूल पवार हे नेहमी व्याजाने पैसे घेत होते. सन 2017 मध्ये राहूल पवार यांचे सासरे जालिंदर पांडुरंग टमटमे ( रा.वांगी नंबर 1 ता. करमाळा) यांची जमीन सोडविण्याकरिता राहूल पवार यांनी त्यांच्या नावावर रमेश थोरात यांचेकडून सहा लाख रूपये पाच टक्के व्याजदराने घेतले होते.दररोज एक हजार रूपये प्रमाणे महिना तीस हजार रूपये असे एकूण पाच लाख चाळीस हजार रूपये परत दिले होते.

कोरोनामुळे लाॅकडाऊनच्या काळात राहूल पवार यांचा मसाला विक्रीचा व्यवसाय बंद झाला. त्यामुळे व्याज व मुद्दल देता आले नाही. ती रक्कम दहा लाख रूपये झाली होती. सन 2021 मध्ये राहूल पवार यांनी भाजीपाला दुकानाच्या बांधकामा साठी रमेश थोरात यांचेकडून दोन लाख घेतले होते.एप्रिल 2023 मध्ये रमेश थोरात हे मयत झाले.

त्यानंतर व्याजाचे पैसे व मुद्दल आणण्यासाठी धीरज थोरात हा राहूल पवार याचे कडे येत होता. राहूल पवार यांनी धीरज थोरात यांना एक लाख रूपये दिले तसेच ऑनलाईन पैसे पाठवले होते. त्यानंतर देखील राहूल पवार यांचेकडे धीरज थोरात बारा लाख रूपयांची मागणी करीत होता. या व्यवहारासंदर्भात काही स्थानिकांनी भाग घेऊन मिटविण्याचा प्रयत्न केला.परंतू त्यामध्ये यश आले नाही.

रविवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भाजीपाला दुकानात राहूल पवार हे भाजीपाला विक्री करीत असताना काळ्या रंगाची कार दुकानासमोर येऊन थांबली या कारमधून पाचजण उतरले त्यापैंकी एका व्यक्तीच्या डोक्यावर टोपी होती.

त्यांच्यापैंकी दोघेजण पिस्तूल घेऊन दुकानात आले.एकाने राहूल पवार यांच्या दिशेने गोळी मारण्याच्या उद्देशाने रोखून धरल्यानंतर ते खाली बसले.त्याने दोन गोळ्या झाडल्या. दुसऱ्या व्यक्तीने त्याच्याकडील पिस्तुल गोळी मारण्याच्या उद्देशाने राहूल पवार वर रोखून धरली असता त्याने हातात खुर्ची घेऊन थांबला त्यामुळे त्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने एक गोळी झाडली ती गोळी उजव्या पायाच्या मांडीवर लागली.

त्यानंतर राहूल याने त्याच्या हातातीलपिस्तुल हिसकावून घेतली ती जमीनीवर पडली.त्यावेळी बाहेरील बाजूस उभे असलेले तिघेजण भाजी ठेवलेल्या टेबलावरून उडी मारून आत आले.त्यापैकी एकाने कोयत्याने पाठीवर वार केला.

त्यानंतर त्याने कोयत्याने डोक्यात वार केला. त्यावेळी इतर दोघांनी हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. गोळीबाराच्या आवाजाने शेजारील इतर लोक व राहूल पवार यांचा मेव्हुणा प्रशांत टमटमे हे तेथे धावत आले.त्यामुळे हल्लेखोर कारमध्ये बसून पुण्याच्या दिशेने पळून गेले. प्रशांत टमटमे यांनी जखमी राहूल पवार यांना तातडीने टेंभुर्णीतील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.रात्री उशीरा शस्त्रक्रिया करून त्यांच्या मांडीतील गोळी काढण्यात आली.

या घटनेची माहिती समजताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के हे सहकार्यांसह घटनास्थळी आले.

दरम्यान जिल्हा पोलीसअधिक्षक शिरीष सरदेशपांडे,अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.आरोपींच्या शोधासाठी पोलीसांची पथक रवाना करण्यात आली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.