सोलापूर : नो पार्किंगमध्ये बिनधास्त वाहने लावून जाणे आता वाहनधारकांना महागात पडत आहे. शहरात अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक शाखेची टोइंग व्हॅन फिरत आहे. नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांवर सोलापूर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नो पार्किंगमधील वाहने थेट टोइंग व्हॅनमध्ये दिसत असल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे.
वाहतूक नियमांचे फलक जागोजागी लावले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी वाहनधारक नव्हते. मात्र मागील महिन्यापासून केंद्रीय सुधारित मोटार वाहन कायदा अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंडाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. दररोज सार्वजनिक वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ५० वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे वाहतूक शाखेने आता थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानक, जुना एम्प्लॉयमेंट चौक, शिवाजी चौक, जिल्हा न्यायालय, बेगम पेठ आदी विविध ठिकाणी अशा सर्व नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईतून दंडात्मक कारवाई केली जात असून, वाहनधारकांना आपली वाहने सूचना पाहून लावणे आवश्यक बनले आहे.
प्रत्येक वाहनास सहाशे रुपयांचा दंड
टोइंग वॅनद्वारे वाहने उचलण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे वाहने उपलब्ध आहेत. या व्हॅनवर कार्यरत कर्मचारी नो पार्किंगमधील वाहन उचलण्याचे काम करतात. तसेच वाहतूक शाखा नो पार्किंगमध्ये वाहन उचलण्याचे पाचशे रुपये दंड वसूल करते. एकूण एका वाहनधारकांकडून सहाशे रुपये दंड वसूल केला जात आहे. मागील महिन्यांपासून नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई अधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहे.
वाहनधारक गोंधळात
शहर वाहतूक शाखेच्या वतीने नो पार्किंगमधील वाहने उचलून थेट जेलरोड पोलिस ठाण्यात आणली जात आहेत. दंड न भरणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई केली जात आहे. मागील महिन्यापासून नो पार्किंगमधील वाहने टोइंग क्रेनव्दारे उचलून नेण्यात येत आहेत. वाहन अचानक जागेवर न दिसल्याने अनेक वाहनधारक गोंधळून जात असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे.
सार्वजनिक वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर टोइंग क्रेनव्दारे कारवाई करण्यात येत आहे. शहरात दररोज पन्नास वाहनांवर होते. त्यांच्याकडून पाचशे रुपये दंड आकारला जात आहे.
- दीपक आर्वे, सहायक पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.