Pandharpur : पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचा काळाबाजार उघड

भाविकांकडून पैसे घेऊन व्हीआयपी पदस्पर्श दर्शन देणाऱ्या एका फूलविक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल,लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनाचा काळाबाजार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Pandharpur
Pandharpur sakal
Updated on

पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनाचा काळाबाजार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भाविकांकडून पैसे घेऊन विठ्ठलाचे व्हीआयपी पदस्पर्श दर्शन घडवून देणाऱ्या एका फूलविक्रेत्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमीत शिंदे असे या पेड दर्शन देणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चेतन शशिकांत कबाडे (रा. वाशिंद खातवली, ता. शहापूर, जि. ठाणे) या भाविकाने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.