सोलापूर: गुंतवणूकीतून मोठ्या परताव्याचं गाजर दाखवून सुमारे पाचशे कोटींच्या कथित घोटाळ्यातील प्रमुख आरोपी विशाल फटे (Vishal Fate) फरार झाला होता. पण आज सकाळी त्याचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये त्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच आपण संध्याकाळपर्यंत पोलिसांसमोर हजर होणार असल्याचंही म्हटलं होतं. (Vishal Fate will appear before police till evening Information provided by video) त्यानुसार विशाल फटे आज पोलिसांसमोर हजर राहिला असल्याची बातमी 'साम टीव्ही'ने दिली आहे.
बार्शी येथील विशाल फटे (vishal fate)याच्या फसवणुकीची व्याप्ती राज्यभर असल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. फटे याने राज्यातील शेकडो लोकांना ठकवले आहे. आतापर्यंत फटे याच्या विरोधात ७६ जणांनी तक्रार अर्ज दाखल केलेअसून फसवणुकीची रक्कम १८ कोटी ५३ लाख १७ हजार इतकी झाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्यात आली आहे. आज सायंकाळी तो सोलापूरच्या पोलिस अधिक्षक कार्यालयात दाखल झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
आज सकाळी युट्यूबवर टाकलेल्या व्हिडीओत त्याने म्हटलं होतं की, "लोकांना माझ्यावर विश्वास असेल तर त्यांनी वाट पाहावी किंवा ज्यांना माझ्यावर केस टाकायच्या आहेत त्यांनी बिनधास्त करा. यामध्ये मला काय शिक्षा व्हायची ती भोगायला मी तयार आहे. मला फाशीची शिक्षा जरी झाली तरी मी ती स्विकारायला तयार आहे. मला पळून जायचं नव्हतं आणि मी पळून जाणार नाही. काही गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न मी केला यासाठी मला जो तीन-चार दिवसांचा वेळ हवा होता त्यातच या सर्व गोष्टींचा बोभाटा झाला. त्यामुळं मला काही हालचाल करायला जागाच उरली नाही. संध्याकाळपर्यंत मी माझ्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन हजर होणार आहे," असं फटे यानं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.