ना गुरु, ना शिक्षक, ना कोणता आधार! स्वत:च स्वत:ला घडवले

Vishnu Jadhav
Vishnu Jadhavesakal
Updated on
Summary

माढ्यातील विष्णू जाधव यांनी फॅब्रिकेशनच्या व्यवसायात गगन भरारी घेतली.

माढा(सोलापूर): राहायला घर नाही; कसायला जमीन नाही बाराव्या वर्षातच वडिलांचे निधन सहा बहिणींपैकी तीन बहिणींच्या लग्नाची जबाबदारी अशा परिस्थितीत वडिलांचा सायकल, बत्ती, स्टोव्ह दुरुस्तीचा व्यवसाय पुढे चालवला पण तरीही उदरनिर्वाह भागेना. अशातच कोणतेही व्यवसाय प्रशिक्षण नसतानाही स्वतःचा फॅब्रिकेशनचा स्टार्टअपचा व्यवसाय सुरू केला आणि माढ्यातील विष्णू जाधव यांनी फॅब्रिकेशनच्या व्यवसायात गगन भरारी घेतली. या व्यवसायाचे शिक्षण नाही, कोणताही गुरु नाही, कुणाकडे कामही केले नाही; तरीही स्वतःच स्वत:ला अनुभवातून घडवत गेलेल्या खुद गब्बर असलेल्या विष्णू जाधव यांनाच माढा तालुक्यातील फॅब्रिकेशनची कामे प्राधान्यक्रमाने दिली जातात.

Vishnu Jadhav
दूध संघात माढा, करमाळा, सांगोला किंगमेकर! तयारी निवडणुकीची

आज अनेकजण अनुकूल परिस्थिती असतानाही केवळ आत्मविश्वासाचा अभाव असल्याने व्यवसायात व इतरत्र अपयशी होताना दिसतात. मात्र माढ्यातील विष्णू जाधव यांचा याला अपवाद आहे. सातवीमध्ये शिक्षण घेत असतानाच वयाच्या बाराव्या वर्षीच वडिलांचे निधन झाले. घरात सहा बहिणी, त्यापैकी तीन बहिणींची लग्न वडिलांनी केली होती. वडिलांचा सायकल स्टोव्ह व बत्तीस दुरुस्तीचा व्यवसाय होता. सातवीतच हा व्यवसाय करत त्यांनी तीन बहिणींची लग्न केली. बारावीपर्यंत शिक्षण शाळेत न जाता बाहेरूनच शिक्षण घेतलं. वडिलांच्या व्यवसायात कुटुंबाचा उदरनिर्वाह व बहिणींची लग्न करण्यामध्ये प्रचंड ओढाताण सुरु झाली. त्यामुळे विष्णू जाधव यांच्या डोक्यामध्ये वेगळा व्यवसाय करण्याचा विचार होता. पण जोडीला भांडवल, व्यावसायिक प्रशिक्षण, कुटुंबाचं पाठबळ, मार्गदर्शन करणार वडीलधारी मंडळी कोणी नव्हती. कोणती गोष्ट अनुकूल नसतानाही विष्णू जाधव यांनी स्वतःच स्वतःला खुद गब्बर या पद्धतीने घडवलं आणि दहा वर्षांच्या स्टोव्ह, सायकल, बत्ती दुरुस्तीच्या व्यवसायाला रामराम ठोकला.

Vishnu Jadhav
नैसर्गिक व अध्यात्माची अनुभूती देणारी माढा परिसरातील पर्यटनस्थळे

1995 मध्ये स्वतःचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय कोणत्याही प्रशिक्षणाविना, कोणत्याही कामाचा अनुभव नसताना, कोणत्याही गुरुविना व तुटपुंज्या भांडवलावर सुरू केला. आलेलं प्रत्येक काम हाती घ्यायचं; येत नाही म्हणायचं नाही' अनुभवातून स्वतःची कौशल्यपणाला लावून काम पूर्ण करायचं हा विष्णू जाधव यांचा फंडा होता. विष्णू जाधव यांचं काम परिपूर्ण करण्यावर भर असतो. मन लावून स्वतःच समाधान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीवर ते काम करत राहतात. यामुळे माणसं जोडली गेली. पुढे माढ्यातील सन्मती पतसंस्था व मनकर्णा पतसंस्थेकडून अर्थसाह्य घेत स्वतःचा फॅब्रिकेशनचा मोठा स्टार्टअप व्यवसाय सुरू झाला.

Vishnu Jadhav
नैसर्गिक व अध्यात्माची अनुभूती देणारी माढा परिसरातील पर्यटनस्थळे

सध्या विष्णू जाधव हे ट्रॅक्टर ट्रॉली, टँकर, व्यवसायासाठी लागणारी शेड, एमआयडीसीत लागणारी मोठी शेड गोडवान, पाईपलाईन यासह शासकीय फॅब्रिकेशनची कामे करत आहेत. कामावरती श्रद्धा असणं हे विष्णू जाधव यांचे वैशिष्ट्य असल्याने फॅब्रिकेशनच्या कामासाठी माढा परिसरात विष्णू जाधव यांचे नाव सध्या प्राधान्यक्रमाने घेतले जाते. परिस्थितीला दोष न देता व कोणतीही गोष्ट अनुकूल नसतानाही स्वतः स्वतःला घडवणाऱ्या मितभाषी परंतु पैशापेक्षा कामावरती अधिक प्रेम करणाऱ्या विष्णू जाधव यांनी सर्व प्रतिकूल गोष्टींवर मात करत यश मिळवलं‌ असून आज ते अनेकांना रोजगार देत आहेत. स्वतः चं स्टार्टअप सुरु करणाऱ्यांसाठी विष्णू जाधव यांचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.