"व्होकल फॉर लोकल' ट्रेंडमुळे दिवाळीत ग्रामीण भागातील अर्थचक्राला मिळाली गती ! 

Kem Market
Kem Market
Updated on

केम (सोलापूर) : ग्रामीण भागामध्ये सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर "गावातच खरेदी करा' असा एक खास ट्रेंड बघायला मिळतो आहे. दिवाळीमुळे येथील स्थानिक बाजारपेठा फुलल्या असून व्यापारी, दुकानदार व ग्राहकांकडून "व्होकल फॉर लोकल'चा नारा दिला जात आहे. स्थानिक बाजारपेठेतच खरेदी करा, आपले गाव बळकट करा, असेही वाक्‍य बहुतेक व्यापारी व दुकानदारांना दिलासा देणारे ठरत आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणाने बाजारपेठेत नवचैतन्य आणले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापार व व्यवसायांवर आलेल्या अडचणींवर मात करून दुकानदार पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करतो आहे. तसेच काही अत्यावश्‍यक सेवांनी लॉकडाउनमध्ये साथ दिल्याने ग्राहकही स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करताना आढळून येतो आहे. दिवाळीच्या सणाने ग्रामीण भागात पुन्हा एकदा आशेचा किरण जागवत नवचैतन्य आणले आहे. 

कोरोनामुळे ग्रामीण भागातील अर्थचक्रावर परिणाम झालेला दिसून आला होता; पण दिवाळीच्या सणाने अर्थचक्राला हळूहळू गती मिळताना दिसून येत आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आता स्थानिक व्यावसायिक हाच केंद्रस्थानी ठेवावा लागणार आहे. रिफॉर्म्सच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातही छोटे व्यवसाय, घरगुती उत्पादने, दुकाने उभारताना दिसत आहेत. या व्यावसायिकांना स्थानिक ग्राहकांनी प्राधान्यक्रमाने प्रतिसाद देऊन व्यावसाय वृद्धीसाठी प्रयत्न करायला हवेत. 

केम येथील व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर तळेकर म्हणाले, लॉकडाउनमुळे गेली सात ते आठ महिने ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिक, दुकानदार यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण दिवाळी हा सण सर्वांत मोठा मानला जातो आणि या सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडतो आहे. विशेषतः स्थानिक दुकानातून खरेदी करण्यावर ग्राहकांचा कल दिसून येत आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला अजून बळकटी येण्यासाठी सर्वांनी या प्रकारची भूमिका घेऊन एकत्र प्रयत्न करायला हवेत. 

व्यावसायिक विजयसिंह ओहोळ म्हणाले, लॉकडाउननंतर लोक प्रथमच दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. लॉकडाउनच्या काळात गावातील व्यापारी, भाजी विक्रेते,फळविक्रेते, लहान व्यापारी यांचे फार मोलाचे योगदान लाभले. या वेळी एकही ऑनलाइन शॉपिंग कंपनी सर्वसामान्य लोकांच्या मदतीला आली नाही. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था देखील डबघाईला आली होती. तेव्हा हेच व्यापारी, भाजी विक्रेते जनतेसाठी धावून आले, म्हणून लोकांनी सुद्धा या दिवाळीत खरेदी करताना पहिले प्राधान्य गावातील व्यापारी वर्गाला दिले पाहिजे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()