यंदाही आषाढी यात्रेवर आणि पालखी सोहळ्यावर कोरोनाचे संकट आले आहे.
पंढरपूर (सोलापूर) : आषाढी यात्रेच्या वेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांचे शेवटच्या मुक्कामाचे ठिकाण असलेल्या वाखरी (ता.पंढरपुर) ग्रामपंचायतीने यंदाचा पालखी सोहळा गतवर्षी प्रमाणे प्रातिनिधीक स्वरूपात साजरा करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे लेखी पत्र आळंदी संस्थानला पाठवण्यात आले आहे, अशी माहिती वाखरीच्या सरपंच कविता तुकाराम पोरे यांनी दिली. (wakhari gram panchayat has demanded to celebrate palkhi ceremony in a representative manner this year)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या आषाढी सोहळ्यासह पंढरपूरमध्ये भरणाऱ्या चारही प्रमुख यात्रा रद्द कराव्या लागल्या होत्या. यावर्षी तरी पायी वारी व्हावी, अशी अपेक्षा पालखी सोहळा प्रमुख, महाराज मंडळी, व्यापारी आणि भविकांमधून व्यक्त केली जात आहे.
मात्र यंदाही गतवर्षी पेक्षा मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे यंदाही आषाढी यात्रेवर आणि पालखी सोहळ्यावर कोरोनाचे संकट आले आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीना पत्र लिहून त्यांचा अभिप्राय मागवला आहे आणि गावातील कोरोनाची परिस्थिती जाणून घेतली आहे.
वाखरी ग्रामपंचायतने संस्थानला उत्तर देताना यंदाही गत वर्षीप्रमाणे एस टी बस मधून, मोजक्या वारकऱ्यांसह प्रातिनिधीक स्वरूपात पालखी सोहळा साजरा करावा अशी विनंती केली आहे. आता हा संसर्ग कमी होत असला तरी सोलापूर जिल्ह्यात आणि पंढरपूर तालुक्यासह वाखरी गाव कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. वाखरी या गावात सर्वच संतांच्या पालख्यांच्या शेवटचा मुक्काम असतो. दोन वर्षांनी पालखी सोहळे आले तर इथे मोठी गर्दी होऊ शकते.
वाखरी गावात जवळपास 800 कोरोनाबधित रुग्ण सापडले होते. तर 30 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 30 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत पायी आषाढी यात्रा सोहळा होणे पालखी सोहळ्यातील भाविक आणि वाखरी सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ यासाठी धोक्याचे ठरणारे आहे. म्हणून गतवर्षी प्रमाणे प्रमुख संतांच्या पालख्या एस टी बसने आणून आषाढी यात्रा सोहळा प्रतिनिधिक स्वरूपात साजरा करावा आणि परंपरा जोपासली जावी अशी सूचना वाखरी ग्रामपंचायतीने प्रशासनासह आळंदी संस्थांनकडे केली आहे. आता प्रशासन व पालखी सोहळा प्रमुख काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आषाढी यात्रा सोहळ्याबाबत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने पायी सोहळ्याबाबत आमचे मत मागितले होते. आमच्या गावात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे. अजूनही रुग्ण आहेत. सध्या बाधित रुग्ण कमी असले तरी परिस्थिती गंभीरच आहे. असे असताना पायी वारकऱ्यांसोबत पालखी सोहळे काढल्यास ग्रामस्थ, सोहळ्यातील भाविकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे गतवर्षी प्रमाणे यंदा ही मोजक्या पालख्या, त्यामध्ये किमान भाविकांना परवानगी द्यावी. कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करून, येणाऱ्या पालख्यांना ग्रामपंचायत आवश्यक सर्व सुविधा देईल, असे संस्थान ला कळवले आहे असे सरपंच कविता पोरे यांनी सांगितले. (wakhari gram panchayat has demanded to celebrate palkhi ceremony in a representative manner this year)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.