Solapur Water Crisis : पाणीपट्टी ३६५ दिवसांची घेता अन्‌ पाच दिवसांआड पाणी देता?

नागरिकांचा सवाल : अवेळी पाणीपुरवठ्याने कुटुंबाचे नियोजन विस्कळित
Solapur Water Crisis
Solapur Water CrisisSakal
Updated on

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्यावतीने नागरिकांकडून वर्षभरातील ३६५ दिवसांची पाणीपट्टी आकारली जाते. नागरिकांना पाणीपुरवठा मात्र पाच दिवसाआड होतो. पावसाळा असो की उन्हाळा, उजनी शंभर टक्के भरले किंवा नाही भरले सोलापुरात रोज नाही तर किमान दिवसाआड देखील पाणी पुरवठा होत नाही.

आमच्याकडून वर्षभराची पाणीपट्टी घेता आणि आम्हाला पाच दिवसाआड पाणी पुरवठा करता, असा सवाल आता सोलापुरातील नागरिक विचारू लागले आहेत. सोलापूर शहराचा पाणी पुरवठा, समांतर जलवाहिनीचे काम, उजनी धरणातून भीमा नदीत सोडले जाणारे पाणी, समांतर जलवाहिनी पूर्ण झाल्यानंतर उजनीतील पाणी वाटपाचे नियोजन,

आवश्‍यक उपाययोजना या बद्दल सविस्तर माहिती देणारे विशेष पान ‘सकाळ’ने शुक्रवारच्या (ता. १७) अंकात प्रसिद्ध केले होते. सोलापूर शहर व जिल्ह्याच्या ज्वलंत प्रश्‍नाला वाचा फोडल्याबद्दल वाचकांनी ‘सकाळ’चे अभिनंदन केले. पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, पाणी टंचाईचे संकट नाहीसे व्हावे यासाठी वाचकांनी देखील काही उपाययोजना सुचविल्या आहेत.

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई ही मोठी समस्या आहे. बाळे हद्दवाढ भागात सहा दिवसाला पाणी येते. पाणी टंचाईचे परिणाम हे संपूर्ण कुटुंबावर होत आहेत. बाळे परिसरातील लाइट नसल्यावर पाणी भरणे कठीण होते.

सोलापूर शहरात अनेक ठिकाणी बोगस नळ कलेक्शन आहेत. ती देखील बंद होणे तितकेच गरजेचा आहे. इतर ठिकाणी ज्या दाबाने पाणी सोडले जाते त्याच पद्धतीने पाणी पोचणे आवश्यक आहे. सोलापूर महापालिकेने बाळे हद्दवाढ भागात दोन ते तीन दिवसाला पाणी सोडावी ही विनंती.

- दीपक करकी, बाळे, सोलापूर

सोलापुरात सध्या पाच दिवसाआड पाणीपुरवठा होतो. सोलापुरातील नागरिक नियमित टॅक्स भरतात मग त्यांना पाणी पाच दिवसांआड का?, पाणीपुरवठ्यासाठी नियोजन व वेळेची विभागणी होणे गरजेची आहे. प्रामुख्याने नोकरदार वर्गासाठी पाणी सोडण्याच्या वेळा निश्‍चित कराव्यात.

लवकरात लवकर समांतर जलवाहिनीचा पूर्ण करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा. राजस्वनगर भागासाठी सकाळी सहा वाजता किंवा संध्याकाळी सात वाजता ही पाण्याची वेळ योग्य ठरेल. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व जलसंपदा विभागाने उत्कृष्ट नियोजन करून अंमलबजावणी करावी. उत्कृष्ट कार्यासाठी सोलापूरकरांचा सदैव पाठिंबा राहील.

- वैभव कुलकर्णी, राजस्वनगर, सोलापूर

पाणी वाचवायचे असेल तर प्रथम सरकारने सर्वांनाच रेन हार्वेस्टींगसाठी अनुदान द्यायला हवे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भूगर्भातील पाणी पातळी वाढेल. बोअरच्या पाण्याची क्षमता वाढेल. लोकांना फुकट पाहिजे, पर्यावरणासाठी खिशातील चार पैसे खर्च करायचे म्हटलं कि असंख्य कारणे दिली जातात. पावसाळ्याचे पाणी गटारीत मिसळून वाया जाते.

किचन मधल्या बेसिनच्या पाण्यासाठी वेगळी पाईप लाईन करून ती लाईन रेन हार्वेस्टींगच्या लाईनला जोडली पाहिजे. कमोड सिस्टममुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. ही सिस्टिम बंद करावी. एका घरासाठी एकच संडासची परवानगी द्यावी. वन, टु, थ्री, फोर बीएचकेच्या प्रत्येक खोलीमध्ये एक कमोड व बेसिन आहेत, त्यामुळे पाणी वापराचे प्रमाण वाढत चालले आहे.

- लक्ष्मणराव शेटे, सोलापूर

सोलापुरातील रेल्वे लाईन्स १६५/६, आदर्श मेहता हॅास्पिटलजवळ नेहमी पाण्याच्या दिवशी खूप पाणी गळती होते. या ठिकाणी असलेला नळ फुटला आहे. या भागात पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे. हा अपव्यय टाळण्यासाठी तातडीने उपााययोजना कराव्यात. या वर्षी पाणी टंचाईचे संकट मोठे आहे. संकटाच्या काळात सर्वांनीच जपून पाणी वापरायला हवे.

- अंजली करकमकर, रेल्वे लाईन्स, सोलापूर

कर्णिकनगर भागातील घरगुती हौदाला बॉल कॉक नाहीत. त्यामुळे या भागात ज्या दिवशी नळाला पाणी येते, त्या दिवशी रस्त्यावर पाण्याचे अक्षरश: पाट वहात असतात. पाण्याचे महत्त्व दुष्काळात, टंचाईच्या काळात समजते. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. पाण्याचा अपव्यय टाळावा. पाणी जपून वापरले पाहिजे. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात. नागरिकांनीही आपली जबाबदारी म्हणून पाणी जपूनच वापरले पाहिजे.

- सत्यनारायण पोटाबत्ती, कर्णिकनगर, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.