मांगी तलावात पाणी नसतानाच करमाळा MIDCला केले आरक्षित

मांगी तलावात प्रशासनाने अगोदर पाण्याची तरतूद करावी किंवा मांगी ऐवजी उजनी वरून एमआयडीसीसाठी पाण्याची योजना सुरू करावी.
मांगी तलावात पाणी नसतानाच करमाळा MIDCला केले आरक्षित
Updated on
Summary

मांगी तलाव हा एक टीएमसी क्षमतेचा आहे.

पोथरे (सोलापूर) : आडातच नाही तर पोहर्‍यात येणार कुठून? अशी जुनी म्हण आहे. अशीच परिस्थिती शासनाची सुरू झाली आहे. सध्या मांगी तलावात कायमस्वरूपी कुठलेही पाणी येण्याचे साधन नसताना करमाळा मांगी रोडवरील एमआयडीसीसाठी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे ना शेतकरी जगणार ना एमआयडीसी सुरु राहणार. त्यामुळे मांगी तलावात प्रशासनाने अगोदर पाण्याची तरतूद करावी किंवा मांगी ऐवजी उजनी वरून एमआयडीसीसाठी पाण्याची योजना सुरू करावी. तरच या दोन्ही गोष्टी चालू शकतात.

मांगी तलावात पाणी नसतानाच करमाळा MIDCला केले आरक्षित
करमाळा तालुक्‍यातील मांगी तलाव तब्बल 11 वर्षानंतर भरला 

मांगी तलाव हा एक टीएमसी क्षमतेचा आहे. मात्र सततची दुष्काळी स्थिती व कान्होळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामुळे तलावातच पाणी येत नाही. त्यात सहा फुट गाळ व बोरगाव प्राधिकरण योजनेसाठी 15 टक्के पाणी आरक्षित आहे. अशा स्थितीतही मांगी एमआयडीसीसाठी पाणी आरक्षित करण्यात आली आहे. आमदार संजयमामा शिंदे यांनी कुकडी प्रकल्पातील पाणी पाईपलाईनद्वारे करमाळा तालुक्यासाठी यावे अशी मागणी केलेली आहे. त्यानुसार त्याचे सर्वेक्षण होणार, शासन त्याला निधी कधी देणार, त्याचे काम पूर्णत्वास कधी जाणार, पाणी कधी येणार शिवाय कुकडी प्रकल्पात पाण्याची उपलब्धता आहे की नाही या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत.

एमआयडीसी ही कायम स्वरूपी चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पाण्याअभावी एमआयडीसी बंद पडली तर कामगारांचे काम, मागणीदाराचा पुरवठा होणार नाही. शिवाय वीजबिल, कामगार आदी बाबींमुळे सर्व यंत्रणाच केवळ पाण्या अभावी बंद पडू शकते. त्यामुळे एमआयडीसी चालवायची असेल तर आगोदर तलावात कायमस्वरूपी एक टीएमसी पाणी उपलब्ध करणे गरजेचे आहे.

मांगी तलावात पाणी नसतानाच करमाळा MIDCला केले आरक्षित
कुकडीच्या पाण्याने भरा मांगी तलाव; शेतकऱ्यांनी केली आमदार शिंदे यांनी लक्ष घालण्याची मागणी 

करमाळा शहराला पिण्याचे पाणी उजनी वरून येत आहे. मग करमाळा हद्दीतच असलेल्या एमआयडीसीला का पाणी येत नाही. उजनीचे पाणी मांगी तलावात आणले तर एमआयडीसीबरोबर शेतीचाही प्रश्न सुटेल.

- किसन शिंदे, माजी सभापती- करमाळा पंचायत समिती

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मांगी तलावातील पाणी एमआयडीसीसाठी आरक्षित करणे हा शेतकऱ्यांवर केलेला अन्याय आहे. आमदार संजयमामा शिंदे यांनी पाणी आरक्षित करण्या आधी तलावत पाणी आणणे गरजेचे होते.

- हरिश्चंद्र झिंजाडे, अध्यक्ष- शिरत्न मित्रमंडळ, पोथरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.