नरखेड (सोलापूर) : मोहोळ तालुक्यातील भोगावती नदीत उजनी धरणातील पाणी आले आहे. त्यामुळे भोगावती नदी परिसरातील गावागावांत भोगावती नदीत उजनीचे पाणी आले रे आले असे म्हणत शेतकऱ्यांच्या आनंदला अक्षरशः उधाण आले आहे.
मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागासाठी कोणताही पाणी श्रोत नाही. भीमा सीना जोड कालव्याच्या माध्यमातून सीना नदीत उन्हाळी आवर्तन सोडले आहे. हे पाणी मोहोळ तालुक्यातील घाटणे येथील बेरीज बंधाऱ्यात आडवले आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते तथा नरखेड जिल्हा परिषद गटाचे सदस्य उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री आजितदादा पवार व जयंत पाटील यांच्याशी भेट घेऊन घाटणे बॅरेज बंधारा सात फूट पाणी अडवण्यासाठी प्रयत्न करून संबंधित विभागाला पाणी आडवण्यास भाग पाडले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आडले गेले. या पाण्याचे बॅक वॉटर सीना नदीतून भोगावती नदीत भोयरे नरखेड मार्गे डिकसळपर्यंत येऊन पोहोचले आहे. त्यामुळे कोरड्या ठणठणीत भोगावती नदी भीमा नदीचे पाणी आले आहे.
ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी आल्यामुळे मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातील भोयरे, नरखेड, डिकसळ शिवारातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. डिकसळ बंधाऱ्यात पाणी पूजनासाठी डिकसळ व नरखेड येथील शेतकरी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. परंतु याच पाण्यासाठी डिकसळ बंधाऱ्याच्या वरच्या भागातील डिकसळ, मसले चौधरी, देगाव, वाळूज शिवारातील शेतकरी घाटणे बॅरेज बंधाऱ्यातील पाणी बॕक वॉटरने मीळावे अशी मागणी करत आहेत.
उमेश पाटील म्हणाले, देगाव, वाळुजपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत उजनीतून पाणी बंद करू नये अशी मागणी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष अधिकारातून उन्हाळ्यातील टंचाई ग्रस्त परिस्थिती लक्षात घेवून कर्नाटकमध्ये वाहून जाणारे पाणी भोगावती नदीमध्ये साठवण्यात येणार आहे. देगाव, वाळूजपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत उजणीतून पाणी बंद करु नये, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी केल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.