"उजनी'तून सोडले सोलापूरसाठी पाणी ! 3600 क्‍युसेक विसर्ग

उजनी धरणातून गुरुवारी सोलापूरसाठी पाणी सोडण्यात आले
Ujani Dam
Ujani DamCanva
Updated on
Summary

उजनी धरणातून आज (गुरुवार) सकाळी 11 वाजता 1800 क्‍युसेकने पाणी सोडण्यास सुरवात झाली. सायंकाळी पाच वाजता यात वाढ करून 3600 क्‍युसेक विसर्ग करण्यात आला.

केत्तूर (सोलापूर) : सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्रोतांपैकी औज बंधारा कोरडा पडला असून, टाकळी बंधाऱ्यात सध्या सोलापूर शहराला जेमतेम पंधरा दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. भीमा नदी (Bhima River) कोरडी पडल्याने पंढरपूर, (Pandharpur) मंगळवेढा, (Mangalwedha) सांगोला (Sangola) या शहरांसह नदी काठावरील गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे उजनी धरणातून (Ujani Dam) आज (गुरुवार) सकाळी 11 वाजता 1800 क्‍युसेकने पाणी सोडण्यास सुरवात झाली. सायंकाळी पाच वाजता यात वाढ करून 3600 क्‍युसेक विसर्ग करण्यात आला. (Water was released from Ujani dam for Solapur on Thursday)

Ujani Dam
ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचा वाढला धोका ! निखळताहेत कमानीचे दगड

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा कोरडा पडला आहे. त्यामुळे सोलापूर शहरावर पाणीटंचाईचे तीव्र संकट येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. औज बंधारा परिसरातील भीमा नदीतील टाकळी जॅकवेलजवळ आजमितीला फक्त 9 फूट पाणी असून, हे पाणी केवळ आठवडाभर सोलापूरकरांना पुरेल, अशी शक्‍यता येत आहे. उजनी धरणातून सोडलेले पाणी औज बंधाऱ्यात येण्यासाठी किमान दहा ते बारा दिवस लागणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी व उजनी अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आला होता.

Ujani Dam
पालकमंत्र्यांच्या नावे खपविले कोरोनाचे अपयश !

औज बंधाऱ्यासोबतच भीमा नदीवरील 14 बंधारेही भरून घेतले जाणार असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. सद्य:स्थितीला उजनी धरण मृतसाठ्यात असून त्यापैकी तीन टीएमसी पाणी वापरले गेले आहे. धरणाच्या मृतसाठ्यात 60 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. सोलापूरसाठी उजनी धरणातील सुमारे 5.5 टीएमसी पाणी वापरले जाणार असून उजनी पाणीसाठा दहा ते बारा टक्‍क्‍यांनी कमी होणार आहे.

दरम्यान, उजनीतून सोलापूरला पिण्याचे पाणी देण्यासाठी कोणाचाही विरोध नाही. परंतु याबाबत "उचकी थोडी आणि गुळणी मोठी' असा प्रकार होत असल्याने सोलापूरसाठी पिण्याचे पाणी भीमा नदीतून सोडण्याऐवजी पाइपलाइनमधून देणे गरजेचे आहे. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर होणारा अपव्यय थांबणार असल्याचे केत्तूर येथील शेतकरी अशोक पाटील यांनी सांगितले.

आकडे बोलतात...

  • एकूण पाणीपातळी : 490.600 मीटर

  • एकूण पाणीसाठा : 1719.57 दलघमी

  • उपयुक्त साठा : उणे 83.24 दलघमी

  • एकुण पाणीसाठा : 60.72 टी.एम.सी.

  • उपयुक्त साठा : उणे 2.94 टी.एम.सी.

  • टक्केवारी : उणे 5.49 टक्के

  • नदीत विसर्ग : 3600 क्‍युसेक

  • कालवा : 3,150 क्‍युसेक

  • बोगदा : 560 क्‍युसेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.