काय म्हणताय ! म्हशीला झाले गायीप्रमाणे पांढरे शुभ्र रेडकू ? 

pandhre redku.jpg
pandhre redku.jpg
Updated on

द. सोलापूर (सोलापूर) ः अनेक अनाकलनीय गोष्टी यंदा घडतानाच आज (ता.21) त्यात अजून एक भर पडली असून सोलापूर शहरालगत असलेल्या देगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील चंद्रकांत भडोळे यांच्या म्हशीने सकाळी सहा वाजता चक्क पांढऱ्या शुभ्र रेड्याला जन्म दिला आहे. अत्यंत दुर्मिळ घटना असल्याने पशूपालक व शेतकरी वर्गातून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

देगाव परिसरातील शीएनएस हॉस्पीटलजवळ चंद्रकांत भडोळे यांची वस्ती आहे. मुलगा रविकांत एका कंपनीत कामाला असून श्री भडोळे शेतीसह मळणी यंत्राचा व पशूपालनाचा व्यवसाय करतात. देगाव परिसरात दुभत्या जनावरांची संख्या मोठी आहे. अनेक शेतातून वैरणचेच पीक घेतले जाते. 


श्री. भडोळे यांनीही याच वैरणीवर घरात तीन म्हशींची जोपासना केली. त्यातून दूधाचा व्यवसाय ते करतात. गेल्या दोन वर्षात पेंड, भूस्सा व गवताचे वाढलेले भाव यामुळे त्यांनी दोन म्हशी विकल्या. सध्या एकच म्हैस त्यांच्याकडे आहे. ही म्हैससुध्दा विकण्याच्या बेतात असतानाच ती गरोदर राहीली. आता प्रसुत झाल्यानंतर त्यांचे विकण्याचे नियोजन होते. त्याच म्हशीने सकाळी सहा वाजता गायीच्या वासराप्रमाणे पांढऱ्या शुभ्र रेड्याला जन्म दिला. या रेड्याच्या अंगावर कुठेही काळा डाग नाही. अत्यंत दुर्मिळ घटना असल्याने त्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. मुलगा रविकांत यानेही या घटनेला सोशल मिडीयाद्वारे व्हायरल केल्याने अनेक ठिकाणाहून चौकशीसाठी फोन येत असल्याचे रविकांत याने "सकाळ' ला सांगितले. हे दुर्मिळ रेडकू अनेकांनी पाळण्यासाठी मागितले आहे. परंतू त्याच्या देखभालीची हमी असल्याशिवाय देणार नसल्याचे रविकांत याने सांगितले.  

 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.