नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर यासह इतर जिल्ह्यातील दवाखान्यांमध्ये काही महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीत जीवित व वित्तहानीही मोठी झाली.
सोलापूर - शहरातील उंच इमारती, (Building) रुग्णालये, (Hospital) उद्योगांमध्ये (Industry) आगीच्या (Fire) घटना होऊ नयेत, निरापराधाचा जीव जाणार नाही, यासाठी प्रत्येक ठिकाणी अद्ययावत फायर सिस्टिम (Fire System) असणे बंधनकारक (Compulsory) आहे. फायर सिस्टिम "ओके' असल्याचा कागदोपत्री शेरा असतानाही त्याठिकाणी आग लागल्यास परवानगी देणाऱ्याकडे बोट दाखविले जाते. परंतु, प्रत्यक्षातील स्थिती आणि कागदोपत्री वेगळे चित्र अनेकदा पहायला मिळते. त्यामुळे आता शासनाच्या (Government) आग्निशामक विभागाने दिलेल्या परवानगीवरच (एनओसी) (NOC) प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर यासह इतर जिल्ह्यातील दवाखान्यांमध्ये काही महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीत जीवित व वित्तहानीही मोठी झाली. त्यानंतर तेथील फायर सिस्टिमवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वच रुग्णालयांना फायर ऑडिट करा आणि त्याचा अहवाल तत्काळ द्या, असे आदेश दिले. काही ठिकाणी मोठ्या इमारतीला आग लागल्यानंतरही तसेच आदेश दिले जातात. तरीही, पुन्हा आग लागतेच कशी, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. बहुधा आगीचे कारण हे शॉर्ट सर्किट हेच दाखविले जाते. मार्चएण्डला आगीच्या घटनांमध्ये वाढ होते, असे चित्र आहे. परंतु, पुढे त्या आगीचे नेमके कारण काय, हे गुलदस्त्याच राहते. आग लागल्यानंतर काही वेगळे आदेश किंवा कारवाई अथवा कागदोपत्री उपाय शोधण्यापेक्षा आग लागणारच नाही, यादृष्टीने शासकीय यंत्रणांनी ठोस नियोजन करण्याची गरज व्यक्त केली जाते. जेणेकरून कोणतीही हानी होणार नाही.
एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या तुलनेत जानेवारी ते मार्च या काळात आगीच्या घटना वाढलेल्या असतात. वातावरणातील बदल (उन्हात वाढ) हाच त्याला कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. आगीची घटना घडल्यानंतर नुकसान भरपाईसाठी संबंधितांची धडपड सुरू असते.
- केदार आवटे, अग्निशमन अधिकारी, सोलापूर
आग्निशामकची "एनओसी' बंधनकारक
रुग्णालयांना वापर परवाना देण्यापूर्वी आग्निशामक विभागातर्फे त्याठिकाणी स्पॉट व्हिजिट केली जाते. तेथील फायर सिस्टिमचे फोटो काढून आरोग्य विभागाला ऑनलाइन अपलोड केले जातात. त्याची पडताळणी होऊन नर्सिंग ऍक्टनुसार त्या रुग्णालयास वापर परवाना मिळतो. याच धर्तीवर आता शहरातील मोठ्या बांधकामांना (हौसिंग सोसायटी, अपार्टमेंट) वापर परवाना देण्यापूर्वी तेथील फायर सिस्टिमची पडताळणी होईल आणि त्याचे ऑनलाइन फोटो अपलोड केले जातील. त्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून त्या इमारतीस वापर परवानगी मिळणार आहे. त्यासंबंधीचे स्वॉफ्टवेअर विकसित केले जात असल्याची माहिती आग्निशामक विभागाचे अधिकारी केदार आवटे यांनी दिली.
काहीजण म्हणतात, थांबा फोटो काढायचाय...
मागील 15-20 दिवसांत आगीच्या चार घटना घडल्या असून, त्याठिकाणी जीवितहानी झाली नाही, परंतु मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, आग लागल्यानंतर घटनास्थळी काही वेळातच आग्निशामकचे जवान पोहोचतात. जीवाची बाजी लावून आग विझवतात. त्याचवेळी काहीजण म्हणतात, पाईप हातात धरून थोडे उभे राहा, आम्हाला फोटो काढायचा आहे. तो फोटो पुढे आम्हाला लागेल, असा अनुभवही श्री. आवटे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.