सोलापूर विद्यापीठाला ‘ए’ की ‘ए प्लस’ ग्रेड मिळणार?

नॅक मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण; समितीचा अहवाल कुलगुरूंकडे सुपूर्द
Solapur University News
Solapur University Newsesakal
Updated on

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे दुसरे नॅक मूल्यांकन शनिवारी यशस्वीरीत्या पूर्ण झाले. नॅक तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष केरळ येथील कन्नूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम. के. अब्दुलकादर यांनी पडताळणी अहवाल नॅक कार्यालयास ऑनलाइन पाठविला. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडेही स्वतंत्र अहवाल सुपूर्द करीत मूल्यांकन झाल्याचे जाहीर केले. आता विद्यापीठाला कोणता ग्रेड मिळणार याची उत्सुकता आहे.

Solapur University News
सातारा : फलटणमधून विमानसेवा सुरू करणार

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन एसएसआर आणि डीव्हीव्ही बंगळुरूच्या नॅक कार्यालयाने स्वीकारले. नॅकच्या तज्ज्ञ समितीकडून २० ते २२ जानेवारी दरम्यान विद्यापीठात प्रत्यक्ष पडताळणी पार पडली. गुरुवारी आणि शुक्रवारी विद्यापीठ संकुलातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व कार्यालयांना भेटी देऊन समिती सदस्यांनी चर्चा केली. शनिवारी (ता. २२) विद्यापीठाच्या रंगभवन येथील अभ्यास केंद्रास भेट देऊन परिसराची व अभ्यास कक्षाची पाहणी केली. यशोधरा हॉस्पिटल येथे जाऊन कौशल्य विकास केंद्राच्या अभ्यासक्रमाची माहिती जाणून घेतली.

Solapur University News
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू; 3 दिवस करता येणार प्रवास

त्यानंतर कुलगुरू डॉ. फडणवीस आणि आयक्‍यूएसी विभागाचे संचालक डॉ. व्ही. बी. पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. अब्दुलकादर यांनी विद्यापीठाची प्रगती चांगली असल्याची स्तुती केली. विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्राचे कोर्सेस, टीव्ही, रेडिओ स्टुडिओ तसेच समाजातील विविध घटकांसोबतचे शैक्षणिक संबंध हे विद्यापीठाचे बलस्थान असल्याचेही त्यांनी नमूद केले. समन्वयक शाहिद रसूल यांनीही विद्यापीठास चांगले भविष्य असल्याचे सांगितले. प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार, वित्त व लेखा अधिकारी श्रेणिक शहा यावेळी उपस्थित होते.

Solapur University News
Omicron : आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर

’ए प्लस’ मूल्यांकनाची खात्री

पहिल्या नॅक मूल्यांकनात मानांकन घसरलेल्या विद्यापीठाने अल्पावधीत चांगली प्रगती केल्याचे कौतूक नॅक मूल्यांकन समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी केले. त्यांनी प्रत्येक बाबींवर समाधान व्यक्‍त केल्याने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला निश्‍चितपणे ए प्लस मूल्यांकन मिळेल, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.