Solapur News : अमृतमहोत्सवी कार्यक्रमात काळुंगेचे राजकीय पुनर्वसन होणार का ?

राजकारणाबरोबर मंगळवेढ्यातील वेगवेगळ्या प्रश्नात सहभाग नोंदवत आर्थिक समृद्धीसाठी शिवाजीराव काळुंगे व शोभा काळुंगे यांनी धनश्री पतसंस्थेची स्थापना केली.
solapur
solapursakal
Updated on

मंगळवेढा : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मंगळवेढ्यातील शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेत दोन्ही नेते देणार का ? अशी चर्चा या निमित्ताने होत आहे.

राजकारणाबरोबर मंगळवेढ्यातील वेगवेगळ्या प्रश्नात सहभाग नोंदवत आर्थिक समृद्धीसाठी शिवाजीराव काळुंगे व शोभा काळुंगे यांनी धनश्री पतसंस्थेची स्थापना केली. या पतसंस्थेच्या माध्यमातून तालुक्याची आर्थिक घडी बसवत असताना तालुक्यातील अनेक बेरोजगारांना, व्यवसायासाठी, शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देऊन बँकेची वाटचाल सुरू ठेवली.

या दोघा पती-पत्नींनी कर्जदार, ठेवीदाराचा मोठा विश्वास संपादन केल्यामुळे दीड हजार कोटींच्या ठेवी या संस्थेने पार केल्या. धनश्री ने याचबरोबर जिल्ह्यातील साखर कारखानदारी जिवंत ठेवण्यासाठी सर्वच कारखानदारांना आर्थिक सहाय्य देण्याचे प्रयत्न केल्यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी एका कार्यक्रमात शिवाजीराव काळुंगे यांनी कारखानदाराला मदत केली नसती तर शेतकऱ्या प्रमाणे कारखानदारांना देखील आत्महत्या कराव्या लागल्या असत्या असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

एवढे प्रभावी काम करणाऱ्या शिवाजीराव काळुंगे यांना मात्र राजकीय संघर्ष करावा लागत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल पक्षाने त्यांना बी फार्म दिल्यामुळे त्यांनी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांची साथ सोडल्यामुळे त्यांना एकाची लढत द्यावी लागली. त्यामुळे त्यांनी गेल्या चार वर्षे राजकीय वातावरणापासून थोडे लांब राहण्याचा निर्णय घेतला.असला तरी आमदार न झाल्याची खंत देखील आहे.

solapur
Solapur News : पवारांचा चौथा दौरा पक्ष उभारणीला फायदेशीर ठरणार का ?

परंतु जिल्ह्यातील साखर कारखानदारी जतन करण्यात ज्याप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व स्व. सुधाकर परिचारक यांनी योगदान दिले त्याप्रमाणे सध्या कारखानदारी टिकवून ठेवण्यात शिवाजीराव काळुंगे यांनी योगदान दिले आहे. धनश्री पतसंस्थेचा रौप्य महोत्सव, धनश्री मल्टीस्टेटची तपपृती व शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आज एकाच व्यासपीठ आहेत.

जिल्ह्यातील साखर उद्योगाचे पुनर्वसन करणारे शिवाजीराव काळुंगे यांचे राजकीय पुनर्वसन विधानपरिषदेत हे दोन्ही नेते करणार का ? अशी चर्चा या निमित्ताने मंगळवेढ्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे. वास्तविक पाहता त्याचे सर्वच राजकीय पक्षाशी त्यांचे संबंध चांगले आहेत त्यामुळे त्यांना महायुतीकडून सुद्धा ऑफर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसे संकेत काल अप्रत्यक्षरित्या दिले अशा परिस्थितीत भविष्यात शिवाजीराव काळुंगे ची राजकीय वाटचाल जिल्ह्याच्या राजकारणात परिणाम करणारी असणार हे मात्र नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.