बार्शी: सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट टाकली, चॅटिंग सुरू झाले. त्या महिलेने कोरफळे (ता. बार्शी) येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकास भेटायला बोलावून चोप देऊन १० तोळ्याच्या दागिन्यांसह २७ हजार रुपये रोख व मोबाईल लंपास केला. बार्शी तालुका पोलिस ठाण्यात महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
स्वाती भोसले, सच्या, अमल्या, एक अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अण्णा वाघमारे (वय ४६, रा. कोर्टी, ता. पंढरपूर) शिक्षकाने फिर्याद दाखल केली. ही घटना कोरफळे शिवारात सोमवारी (ता. १६) दुपारी दीड वाजता घडली.